रशिया बिडेन यांना तर चीन ट्रम्प यांना नाही पाहू इच्छित राष्ट्रपतीपदी, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी रशिया डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर क्रेमलिनशी संबंधित लोकांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडणुका जिंकताना पाहायचे आहे. अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, चीन ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्ष बनताना पाहू इच्छित नाही. बीजिंग अमेरिकेत जनतेसाठी अनुकूल धोरण निर्माण करण्याचे आणि चीनच्या हिताच्या राजकीय विरोधकांवर दबाव आणण्याचे प्रयत्न तीव्र करत आहे.

देशाच्या इंटेलिजेंस प्रोग्रामचे रक्षण करणारे नॅशनल काऊंटरइंटेलिजन्स अँड सिक्युरिटी सेंटर (एनसीएससी) चे प्रमुख विल्यम इवानीना यांनी शुक्रवारी रशियाच्या संबंधात हे वक्तव्य केले. ट्रम्प यांना पुन्हा निवडून देण्याच्या रशियाच्या प्रयत्नांविषयी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेची ही सर्वात स्पष्ट घोषणा असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा एक संवेदनशील विषय आहे आणि २०१६ च्या निवडणुकीत रशियाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता, असे गुप्तचर संस्थेचे मूल्यांकन त्यांनी नाकारले आहे. मागील ओबामा प्रशासनाच्या काळात बिडेन यांच्या युक्रेन समर्थित धोरणांमुळे रशिया त्यांच्या विरोधात आहे.

इंटेलिजन्स ऑफिसरच्या या विधानाबद्दल विचारले असता ट्रम्प शुक्रवारी संध्याकाळी म्हणाले, “मला वाटते की रशियाच्या अध्यक्षपदावर ज्या शेवटच्या व्यक्तीला पाहण्याची इच्छा आहे, ते डोनाल्ड ट्रम्प असतील, कारण माझ्यापेक्षा कोणी रशियाविरूद्ध कठोर नव्हते.’ मात्र चीन त्यांना पुन्हा राष्ट्रपती बनताना पाहू इच्छित नाही, हे त्यांनी मान्य केल्याचे दिसते. ट्रम्प म्हणाले की, जर जो बिडेन राष्ट्रपती असते, तर चीनने आपला देश चालवला असता. इवानीना यांच्या वक्तव्याच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष नॅन्सी पॅलोसी आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या इतर खासदारांनी याबाबत टीका केली होती की, गुप्तचर संस्था अमेरिकेच्या राजकारणात परकीय हस्तक्षेपाच्या धोक्यासंबंधी माहिती लपवत आहे.

इवानीना म्हणाल्या, ‘आम्ही प्रामुख्याने चीन, रशिया आणि इराणकडून जारी केलेल्या आणि संभाव्य कारवायांमुळे चिंतेत आहोत.’ त्यांनी म्हटले की, त्यांनी प्रयत्न करूनही अधिकाऱ्यांना असे वाटत नाही कि कोणताही देश निवडणुकीच्या निकालावर महत्त्वपूर्ण बदल करू शकतो.