चीनच्या वैज्ञानिकानं पुन्हा केला दावा, वुहानच्या लॅबमध्येच बनला ‘कोरोना’ व्हायरस, तो चीनी सेनेचा होता ‘शोध’

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – एक चीनी व्हिसिल ब्लोअर आणि वायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी चीनमधून फरार झाल्यानंतर पुन्हा एकदा दावा केला आहे की, कोविड-19 चीनच्या वुहान लॅबमध्ये बनवण्यात आला होता. मात्र, हा दावा चीनी सरकारसह जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा फेटाळला आहे.

एका रिपोर्टनुसार अमेरिकन संस्था नॅशनल प्लसचे म्हणणे आहे की, लॅबमध्ये निर्मित व्हायरस हा चीनी लष्कराचा शोध आहे. व्हिसिल ब्लोअर आणि वायरोलॉजिस्ट ली-मेंग यान यांनी सांगितले की, जोउशान वटवाघुळाचा कोरोना व्हायरस, जेडसी45 आणि जेडएक्ससी21 वर त्यांचा रिपोर्ट लवकरच समोर येईल.

कोरोना व्हायरस हा पीपल्स लिब्रेशन आर्मी (पीएलए) च्या लष्करी तळाच्या नियंत्रणाखालील इमारतीमध्ये विकसित करण्यात आला आहे. जुलैमध्ये एका स्पॅनिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, त्या या गोष्टीचे ठोस पुरावे गोळा करत आहेत की, वुहानच्या मीट मार्केटमधून कोरोना व्हायरस पसरलेला नाही. व्हायरसचा जिनोम सीक्वेंस एका फिंगर प्रिंट प्रमाणे आहे.

या आधारावर तुम्ही वस्तूंची ओळख करू शकता. मी लोकांना याचे पुरावे देईन की, कोरोना व्हायरस चीनच्या एका लॅबमधून आला आहे आणि त्यांनी हा कशासाठी विकसित केला आहे. ली-मेंग एप्रिलमध्ये चीनमधून फरार झाल्या होत्या आणि तेव्हापासून अमेरिकेच्या शरणार्थी आहेत.

यापूर्वी व्हायरस तज्ज्ञ ली-मेंग यान यांनी दावा केला होता की, चीनी सरकारने व्हायरसच्या बाबतीत माहिती लपवली होती. चीनी सरकारने हाँगकाँगच्या संशोधकांसह परदेशी तज्ज्ञांना चीनमध्ये संशोधन करण्यास नकार दिला होता.

ली-मेंग यान यांनी म्हटले होते की, चीनमध्ये महामारीचे केंद्र ठरलेल्या वुहानमध्ये व्हायरसबाबत बोलणार्‍यांना सुद्धा गप्प करण्यात आले होते. तेथील अनेक डॉक्टरांनी म्हटले होते की ते काहीही बोलू शकत नाहीत, परंतु मास्क घालण्याची गरज आहे. ली-मेंग यांचे म्हणणे होते की, जर चीन सत्य उघड केले असते तर त्यांना बेपत्ता केले गेले असते.