Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’मुळे परिस्थिती आणखी बिकट, 24 तासात 865 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सध्या अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण आणि मृत्यूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या बाबतीत अमेरिकेची परिस्थिती चीनपेक्षा वाईट झाली आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे चीनपेक्षा जास्त लोकांचे मृत्यू झाले आहेत.

अमेरिकेत कोरोनामुळे परिस्थिती आणखी बिकट
गेल्या 24 तासांत अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या 865 वर पोहचली आहे. त्याचबरोबर या विषाणूमुळे अमेरिकेत आत्तापर्यंत 3415 लोक मरण पावले आहेत. कोरोना संक्रमणामुळे पीडित लोकांची संख्या 1.74 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिकेच्या 100 च्या इतिहासात अशी त्रासदायक परिस्थिती पाहिली गेली नाही. मृत्यूच्या प्रकरणात अमेरिकेने चीनलाही मागे टाकले आहे.

9/11 पासून मोठी त्रासदायक
9/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत 2996 लोकांचा मृत्यू झाला होता आता कोरोनामुळे मृतांची संख्या 3415 वर पोहोचली आहे. एका आठवड्यातच अमेरिकेत कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण 2500 वरून 174697 पर्यंत वाढले आहे. या कोरोना विषाणूने अमेरिकन लोकांना चांगलेच घेरले आहे. सोमवारी कोरोनामुळे 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर मंगळवारी हा आकडा 865 वर पोहोचला. त्याचवेळी अमेरिकेच्या आरोग्य संस्थांनी इशारा दिला आहे की, अमेरिकेत या विषाणूमुळे 1 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होईल.

पुढील दोन आठवडे खूप आव्हानात्मक
अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूमुळे सगळ्यात जास्त 932 मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. तर न्यू जर्सीमध्ये 247 आणि वॉशिंग्टनमध्ये 150 लोक मरण पावले आहे. अमेरिकेची ही परिस्थिती पाहता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेसाठी पुढील दोन आठवडे अत्यंत आव्हानात्मक आहेत. ते म्हणाले की, देशासमोर अभूतपूर्व आव्हान आहे. देशाची लढाई एका प्राणघातक विषाणूशी आहे, जी आपण पूर्ण ताकदीने लढली पाहिजे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवर चर्चा केली.