अमेरिकेचा पुन्हा WHO वर ‘निशाणा’, आता तायवानच्या व्हायरसच्या इशार्‍याकडं दुर्लक्ष केल्यानं भडकले डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेवर तैवानकडून सुरुवातीपासून कोरोना व्हायरस चेतावणीकडे दुर्लक्ष करत राजकरण केल्याचा आरोप लावला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी डब्ल्यूएचओवर चीनची बाजू घेत असून कोरोनाबाबत जगाला अंधारात ठेवत असल्याचा आरोप करत या संस्थेला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवण्याची धमकी दिली होती. डब्ल्यूएचओ त्याच्यावरील आरोप नाकारत आहे. खरंतर तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डब्ल्यूएचओवर आरोप लावले आहे की, ते देशातील कोरोना प्रकरणे आणि उपचार पद्धती आपल्या सदस्य देशांना सांगत नाहीयेत.

जागतिक महामारीच्या लढाईसाठी डब्ल्यूएचओला निधी देणे थांबवण्याची धमकी देत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले आहेत. टीकाकारांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्याकडून डब्लूएचओ विरोधात दिली जाणारी धमकी एखाद्या परराष्ट्र बळीचा बकरा शोधण्याचे राजकीय षडयंत्र वाटते, कारण कोविड-१९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करत नसल्यामुळे ट्रम्प यांच्यावर खूप टीका होत आहे. कोरोनामुळे अमेरिकेत १५,००० मृत्यू झाले आहेत. ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये स्वतः म्हटले होते ही, अमेरिकेचे कोरोना व्हायरसवर ‘पूर्णपणे नियंत्रण’ आहे आणि अंदाज लावला जात होता कि तापमान वाढल्यानंतर एप्रिल पर्यंत हा आजार जाईल.

डब्ल्यूएचओविरूद्ध ट्रम्प यांच्या आक्रमकतेचे तपशीलवार देत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, डब्ल्यूएचओने कोविड -१९ विषयी चेतावणी देण्यास बराच वेळ लावला आणि चीनची बाजू घेतली. मंत्रालयाने प्रश्न केला की जवळच्या तैवानच्या माहितीची दखल का घेतली नाही. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘जागतिक आरोग्य संघटनेकडून तैवानची माहिती का लपवून ठेवली गेली याबद्दल अमेरिकेला यामुळे त्रास झाला आहे, जसे डब्ल्यूएचओच्या १४ जानेवारी २०२० च्या निवेदनात म्हटले आहे की, माणसापासून माणसाला संक्रमणाचे कोणतेही संकेत नाहीत.’

त्यांनी म्हटले की, ‘डब्ल्यूएचओने परत एकदा सार्वजनिक आरोग्याऐवजी राजकारणाला निवडले आहे.’ प्रवक्त्याने २०१६ पासून पर्यवेक्षक असलेल्या तैवानच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल डब्ल्यूएचओवर टीका केली. प्रवक्त्याने सांगितले की, डब्ल्यूएचओच्या या निर्णयामुळे ‘वेळ आणि जीवन’ दोन्ही वाया गेले. तैवानचे मुत्सद्दी शेन झियान-जिन म्हणाले की, चीनचे जवळचे संबंध असूनही, व्हायरसमुळे तैवानमध्ये केवळ पाच मृत्यू झाले आहेत. त्यांनी ३१ डिसेंबर रोजीच माणसाकडून माणसांमध्ये संसर्गाच्या प्रसाराबद्दल डब्ल्यूएचओला चेतावणी दिली आहे.