अमेरिकेत 2 खासदार कोरोनाग्रस्त, डोनाल्ड ट्रम्प यांनी उचचले मोठे पाऊल, 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेतसुद्धा दोन खासदारांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. फ्लोरिडाचे खासदार मारियो डियाज-बालार्ट आणि बेन मॅकॅडम्स हे बुधवारी नोवेल कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह असल्याचे आढळले. एखाद्या अमेरिकन खासदाराला कोरोनाची लागण झाल्याचे हे पहिले प्रकरण आहे. यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आपली कोरोना व्हायरसची टेस्ट केली होती, परंतु ती निगेटीव्ह आली होती.

मारियो डियाज-बालार्ट यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, थोड्यावेळा पूर्वी त्यांना सांगण्यात आले की, ते कोविड-19 च्या तपासणीत पॉझिटीव्ह आढळले आहेत. यापूर्वी रिपब्लिकनच्या मियामी मेयर फ्रान्सिस सुआरेज यांनी सांगितले की, त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

डियाज-बलार्ट यांनी सांगितले की, ते क्वॉरंटाईन होऊन आपल्या वॉशिंग्टन अपार्टमेंटमधून काम करत आहेत. ते म्हणाले, प्रत्येकाने यास गांभीर्याने घेतले पाहिजे आणि आजारी होण्यापासून वाचण्यासाठी सीडीसीच्या निर्देशांचे पालन करावे.

रिपब्लिकन पार्टीचे फ्लोरिडाचे काँग्रेस सदस्य मारियो डियाज बलार्ट यांच्या कार्यालयाने सांगितले की, शनिवारी ताप आणि डोकेदुखीची तक्रार होती आणि बुधवारी त्यांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळून ओल. डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य आणि खासदार बेन मॅकॅडम्स यांनी सांगितले की, त्यांनाही शनिवारी तापासारखी लक्षणे जाणवत होती आणि नंतर व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आरोग्य आपत्तीची घोषणा केली होती.

अमेरिकन सीनेटने कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात अमेरिकन कर्मचार्‍यांची मदत करण्यासाठी 100 अरब डॉलरच्या पॅकेजला मंजूरी दिली होती. प्रतिनिधी सभेपूर्वीच यास मंजूरी मिळाली होती. ट्रम्प यांच्या सहीनंतर ते लागू झाले. तर फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅनुयल मॅन्क्रो यांनी कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी यूरोजोनमध्ये आर्थिक एकजुटता आणखी वाढवण्याचे आवाहन केले आहे.

चिलीचे राष्ट्रपती सेबॅस्टियन पिनेरा यांनी कोरोना व्हायरस संसर्गामुळे आपत्तीची स्थिती घोषित केली आहे. तर क्यूबामध्ये संसर्गामुळे मृत्यूचे पहिले प्रकरण समोर आले आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्या एका मंत्र्यांना संसर्ग झाला आहे. ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी विमान कंपनी क्वांटासने आपली अंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा मार्चच्या अखेरपासून किमान दोन महिने स्थगित करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी व्हर्जिन विमान कंपनीने अशी घोषणा केली होती.

ऑस्ट्रेलियात 700पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. पुर्तगालने सुद्धा 15 दिवसांचा आपत्काल घोषित केला आहे. पुर्तगालमध्ये आतापर्यंत 448 लोकांना संसर्ग झाला आहे. तुर्कीत कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने एकुण मृत्यूंची संख्या दोन झाली आहे. तुर्कीत 191 जणांना लागण झाली आहे.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या ट्रॅकरनुसार, संयुक्त राज्य अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 7,300 पेक्षा जास्त रूग्ण सापडले आहेत. तर 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांतील हवाई प्रवास स्थगित केला आहे. अमेरिकेत वॅक्सिन तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. काही महिन्यात कोरोना व्हायरसची वॅक्सिन तयार होऊ शकते.