Coronavirus : रूग्णांच्या ‘मेंदू’च्या समस्या देखील वाढवतोय ‘कोरोना’ व्हायरस, ‘देहभान’ हरवण्याचा देखील ‘धोका’

वॉशिंग्टन  :  वृत्तसस्था –  कोरोना व्हायरसचा विळख्यात सापडलेल्या लोकांना खोकला, सर्दी, डोकेदुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास अडचण आणि न्युमोनियासह मेंदूच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहेत. डॉक्टरांच्या मते, कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांच्या मेंदूवर याचा परिणाम होतो. ज्याला एन्सेफॅलोपॅथी असेही म्हणतात. यामध्ये मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याने लोकांची वास घेण्याची आणि चव घेण्याची क्षमता कमी होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना कोणत्या इतर मानसिक समस्या भेडसावत आहेत, हे जाणून घेऊयात…

फ्लोरिडामध्ये रुग्णाने गमवाली चेतना

फ्लोरिडाच्या बोकका रॅटन हॉस्पिटलमधील 74 वर्षाच्या रुग्णासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले की, मार्चच्या सुरुवातीला जेव्हा रुग्णाला हॉस्पीटलमध्ये आणले गेले. त्यावेळी त्याला खोकला आणि ताप आला होता. त्याचा एक्स-रे काढण्यात आला. परिस्थिती सामान्य असल्याचे समजल्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी घरी ताप आल्यानंतर या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात आणले गेले. त्यावेळी त्याची प्रकृती खालावली होती. श्वासोच्छवासाच्या समस्येसह त्याने मानसिक चेतना गमावली होती. तो आपले नाव देखील डॉक्टरांना सांगू शकत नव्हाता. त्याचे हात-पाय थरथरत होते. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्याची तपासणी केली. त्यावेळी आमचा संशय खरा ठरला.

मेंदूच्या पेशी मृत आढळल्या

याचप्रमाणे मंगळवारी डॉक्टरांनी डेट्राईटमधील महिला रुग्णाविषयी धक्कादायक माहिती दिली. एअरलाइन्समध्ये काम करणारी 50 वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या विळख्यात सापली होती. डोकेदुखीमुळे ती महिला गोंधळलेली होती. त्यामुळे ती आपले नाव देखील डॉक्टरांना सांगू शकत नव्हती. या महिलेला वेळेचे कोणतेही भान राहिले नव्हते. तिच्या मेंदूचे स्कॅन करताना मेंदूच्या अनेक भागामध्ये सूज आढळली. या भागांमध्ये काही मृत पेशी आढळल्या. डॉक्टरांनी महिलेची ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत याला नेक्रोटाईजिंग एन्सेफॅलोपॅथी असे नाव ठेवले. इन्फ्यूएन्झा सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे ही स्थिती उद्भवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अर्धांगवायूची लक्षणे, रक्ताच्या गुठळ्या

हेनरी फोर्ड हेल्थ सिस्टमच्या डॉ. इलिझा फोई यांनी एका ईमेलच्या संदेशात सांगितले की, या महिला रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणावरून असे सिद्ध होते की विशिष्ट परिस्थितीमध्ये विषाणू थेट मेंदूवर हल्ला करू शकतो. अमेरिकेप्रमाणे इटली आणि इतर देशातील डॉक्टरांनाही असे आढळून आले आहे की, कोरोनाच्या विषाणूमुळे काही रुग्णांच्या मेंदूवर विपरित परिणाम होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना अर्धांगवायू, बधिर होणे, रक्ताच्या गुठळ्या होण्याची लक्षणे आढळली आहेत. वैद्यकीय शास्त्रामध्ये याला अॅक्रोप्रॅथेसिया देखील म्हणतात. काही प्रकरणामध्ये लोकांना ताप येणे आणि श्वास घेण्यास त्रास होण्यापूर्वीच त्यांची मानसिक स्थिती खालावली आहे.

कोरोना रुग्ण झाले संवेदनाशून्य

इटलीच्या ब्रेस्सिया शहरात अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. अलेजरान्डे पाडोवानी यंनी स्वतंत्र न्यूरो कोवीड युनिट तयार केली आहेत. उपचारासाठी आणलेल्या एन्सेफॅलोपॅथीची लक्षणे असलेले बहुतेक रुग्ण गोंधळलेले आणि असंवेदनशील झाले होते. त्यांना आपल्याविषयी काहीच सांगता येत नव्हते. त्यातले बरेचजण बेशुद्ध होत होते. अशा रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी असे तज्ञांनी सांगितले आहे.