Coronavirus Treatment : ‘कोरोना’ रोखण्याची सापडली नवी पद्धत, लसीचे संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस (कोविड-19) लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शास्त्रज्ञांना एक मोठे यश मिळाले आहे. त्यांनी एक अशी पद्धत शोधून काढली आहे, ज्यामुळे हा धोकादायक व्हायरस रोखता येऊ शकतो. त्यांना अनेक मॉलीक्यूलची माहिती मिळाली आहे, जे कोरोनाशी संबंधाीत एका प्रोटीनवर अंकुश ठेवतात. याच प्रोटीनद्वारे हा व्हायरस प्रगती करतो. या शोधामुळे कोविड-19 च्या उपचाराचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या संशोधनकर्त्यांनुसार, नवा कोरोना व्हायरस सार्स-कोवी-2 पॉलिमर्स नावाच्या प्रोटीनचा वापर करतो. या प्रोटीनच्या आधारे कोरोना संक्रमित मानवी पेशींमध्ये आपल्या जीनोमच्या प्रतिकृती तयार करतो. पॉलिमर्सच्या या प्रक्रियेस नष्ट केल्यास कोरोनची वाढ बंद होईल आणि असे झाल्याने प्रतिकारशक्ती (इम्यून सिस्टम) त्यास नष्ट करू शकते. अँटीव्हायरल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार 11 मधील सहा मॉलीक्यूल पॉलिमर्सच्या प्रतिक्रियेला तात्काळ नष्ट करणात प्रभावी आढळून आले. दोन मॉलीक्यूलला या कामात थोडा वेळ लागला, पण तीन या प्रतिक्रियांवर अंकूश लावण्यास अयशस्वी ठरले.

कोलंबिया युनिव्हर्सिटीचे संशोधक जिंग्यू जू यांनी म्हटले की, आम्ही यासाठी खुप आशावादी आहोत की, आम्ही शोधलेल्या मॉलीक्यूलच्या उपयोगाने नव्या कंपाऊंडची डिझाईल तयार होऊ शकते. याद्वारे कोरोनासाठी नवीन उपचार विकसित करता येऊ शकतो.

कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतेही औषध सापडलेले नाही. रूग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या लक्षणांवर अधारित पर्यायी औषधांचा वापर केले जात आहे. दरम्यान शास्त्रज्ञांनी संशोधन करून कोरोना व्हायरस प्रतिकारशक्तीच्या प्रतिक्रियेचे आकलन करून सहा अणूंच्या अनोख्या पॅटर्नचा शोध लावला आहे. या पॅटर्नचा वापर करून कोरोनावर उपचार करता येणे शक्य होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like