Coronavirus : चीन, इटलीनंतर ‘या’ देशात कोरोना व्हायरसचे आढळले 1 हजार रूग्ण

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे चीननंतरचे लक्ष आता अमेरिका आहे. कारण फक्त न्यूयॉर्क मध्येच एकाच दिवसात तब्ब्ल १००० रुग्ण आढळले असून, काही दिवसांत हा आकडा वाढून १०,००० पर्यंत जाऊ शकतो अशी शक्यता न्यूयॉर्कचे महापौर बिन दे ब्लासिओ यांनी वर्तवली आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा सहावा क्रमांक लागतो. अमेरिकेमध्ये कोरोनाची आतापर्यंत ९४६४ प्रकरण सापडली असून १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात २९०० रुग्ण आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकाच दिवसात तब्ब्ल १००० रुग्ण आढळले आहे.

येत्या काही दिवसात हा आकडा झपाट्याने वाढणार असे म्हणत, न्यूयॉर्कचे महापौर बिल दे ब्लासिओ यांनी सर्वाना सावध केलं आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने त्वरित पावलं उचलावे असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे.