चीन पुन्हा ‘चिंताग्रस्त’ ! हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’ झालेल्या रूग्णांना पुन्हा होतेय ‘कोराना’ची लागण, सरकारनं दिल्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेले लोक उपचारानंतर पुन्हा आजारी पडत आहे. चीनच्या दक्षिण पश्चिम सिचुआन प्रांतच्या चेंगदू शहरात त्या व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, ज्या व्यक्तीला उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले होते. रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलेल्या या व्यक्तीच्या रिपोर्टमध्ये तो पुन्हा कोरोना व्हायरसमुळे पॉजिटिव्ह ठरला होता. शहराच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रातून ही माहिती देण्यात आली.

काही वृत्तांनुसार रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आल्यानंतर 10 दिवसांनंतर तो पुन्हा कोरोना बाधित असल्याचे लक्षात आले. ही चीनमधील पहिली घटना आहे असे नाही. दुसऱ्या परिसरात देखील अशा घटना घडत आहेत. चीनच्या स्थानिक वृत्तपत्रानुसार सांगण्यात आले की डिस्चार्ज झालेल्या रुग्णांच्या रिपोर्टमध्ये विसंगती असल्याने हे प्रकार समोर येत आहेत.

अधिकृत गाइड लाइनमध्ये सांगण्यात आले आहे की डिस्चार्ज केलेल्या रुग्णाची पुन्हा तपासणी केल्यास ती निगेटिव्ह आली पाहिजे. हा व्हायरस पुन्हा प्रबळ होत असल्याने डॉक्टर देखील हैराण आहेत. चीनमधील वृत्तपत्रानुसार या व्हायरसमुळे होत असलेल्या निमोनियावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी सांगितले की रुग्णालयातून सोडण्यात येणाऱ्या रुग्णाच्या नाक आणि गळ्यावरील सुजेच्या परीक्षणाचा उपयोग केला मात्र आता फुफूसातून निघणाऱ्या नमून्याची तपासणी करणे आवश्यक आहे.

आणखी अशीच एक घटना हुबेई प्रांतात समोर आली, ज्यात 70 वर्षीय व्यक्तीच्या उपचारानंतर 27 दिवस कोरोना व्हायरसचे लक्षण दिसले नाही परंतु आता तो कोरोनाने संक्रमित झाला आहे. यानंतर चीनच्या आरोग्य विभागाने सूचना दिल्या की रुग्णालयातील ज्या रुग्णांना सोडण्यात आले आहे त्यांची पुढील 14 दिवस तपासणी आवश्यक आहे. या दरम्यान लोकांनी एकमेकांनी भेटू नये. वेळोवेळी मास्कचा वापर करावा. सरकारने सांगितले की कोरोना व्हायरसचा इंक्युबेशन पिरियड 14 दिवसांपेक्षा अधिक असू शकतो.