Coronavirus World Update : अमेरिकेत दररोज ‘कोरोना’मुळे एक हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू, जाणून घ्या इतर देशांची स्थिती

न्यूयॉर्क : युएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने म्हटले आहे की, मागील चोवीस तासात देशात संसर्गाची 46,754 नवी प्रकरणे समोर आली आहेत. हा लागोपाठ सातवा दिवस आहे, जेव्हा संक्रमितांची संख्या पन्नास हजारपेक्षा कमी राहिली आहे. हॉस्पीटलमध्ये दाखल होणार्‍या रूग्णांची संख्या सुद्धा कमी झाली आहे. मात्र, कोरोनाने दररोज होणार्‍या मृत्यूंची संख्या अजूनही एक हजारपेक्षा जास्त आहे. अशी दहा राज्य आहेत, जेथे संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.

ब्राझीलमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त प्रकरणे
ब्राझीलमध्ये संसर्गाची पन्नास हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे संक्रमितांची संख्या वाढून 35,82,362 झाली आहे. तर 900 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे झालेल्या एकुण मृत्यूंची संख्या 1,14,250 झाली आहे. मेक्सिकोमध्ये संसर्गाची 6,482 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 644 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण कोरियामध्ये संसर्ग सर्वोच्च पातळीवर
मागील चोवीस तासात दक्षिण कोरियामध्ये संसर्गाची 397 नवी प्रकरणे समोर आली. सात मार्चनंतर ही सर्वात जास्त आहेत. मागील 10 दिवसात 2,629 संक्रमित रूग्ण आढळले आहेत. संसर्गाच्या नव्या प्रकरणांपैकी 138 सियोलच्या राहणारे आहेत. तर 124 ग्योंझी प्रांतातील आहेत. 10 रूग्ण परदेशी आहेत. रूग्णांचा बरे होण्याचा दर 81.61 टक्के आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 17 जणांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनामुळे 17 लोकांचा मृत्यू नोंदला गेला आहे. सर्व मृत्यू व्हिक्टोरिया प्रांतातील आहेत. मागील चोवीस तासात येथे 208 नवी प्रकरणे आली आहे. एक दिवसांपूर्वी ही संख्या 182 होती. तर शेजारी न्यूझीलँडमध्ये तीन नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

एक नजर या देशांवर

इस्त्रायल : संसर्गाची 1,140 नवी प्रकरणे समोर आली. देशात संक्रमित रूग्णांचा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. चोवीस तासात येथे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळ : 818 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

रशिया : मागील चोवीस तासात 4,852 नवी प्रकरणे समोर आली आहेत. 73 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इंडोनेशिया : संसर्गाची 2037 नवी प्रकरणे समोर आली आहेत. 86 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीन : संसर्गाची 12 नवी प्रकरणे समोर आली. एक दिवसापूर्वी संक्रमित रूग्णांची संख्या 22 होती.