कोरोना व्हायरस : अमेरिकेत हाहाकार, अडीच लाख संक्रमित तर, मृतांचा आकडा सहा हजारांच्या पुढे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेत कोरोना विषाणूचे तांडव सुरु आहे. सर्व उपाय असूनही, संक्रमित लोकांची संख्या अडीच लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. तर मृतांची संख्या सहा हजारांच्या पुढे गेली आहे. इतक्या दिवसानंतर आता या साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्यासाठी घरी राहून पुढील चार आठवड्यांपर्यंत सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही कोरोनाविरूद्ध लढ्यात आहोत, सध्या अमेरिका एक अतिशय महत्वाच्या टप्प्यात आहे. उद्रेक रोखण्यासाठी प्रत्येक अमेरिकन नागरिकाने 30 दिवस आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे. पुढील चार आठवड्यांसाठी आमचे बलिदान असंख्य अमेरिकन लोकांचे जीवन वाचवेल. तसेच आम्ही व्हायरस रोखण्यासाठी नवीन पद्धतींसह नवीन थेरपी, उपचार आणि लस विकसित करीत आहोत. अमेरिकेत दररोज एक लाखाहून अधिक कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत.

तसेच ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून मास्क निर्माता कंपनी 3एमला धारेवर धरत म्हंटले कि, याची किंमत मोजावी लागेल. एन -95 मुखवटा तयार करणार्‍या या कंपनीने पुरवठा कमी केल्याचे म्हटले जाते. अमेरिकन नागरिकांना संरक्षण करण्यासाठी पुरेश्या मास्कचा साथ नसल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली. दरम्यान, व्हाइट हाऊसने नोंदवले की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात अमेरिकन 33 दशलक्ष लोकांपैकी 30.5 दशलक्ष लोक घरात कैद आहेत. ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक सूचना वाढवल्या आहेत.

न्यूयॉर्कमध्ये रूग्ण आणि मृतदेहांनी भरलेत हॉस्पिटल आणि शवगृह

अमेरिकेतील कोरोना विषाणूचे केंद्रबिंदू बनलेल्या न्यूयॉर्क राज्यात सर्वात जास्त साथीचे रुग्ण आहेत. न्यूयॉर्क शहरातील रुग्णालये रूग्णांनी भरली आहेत. याचा सामना करण्यासाठी शहरात अनेक तात्पुरती रुग्णालये बांधली जात आहेत. शहरातील शवगृहात मृतदेहांसाठी जागा शिल्लक नाही. शहरातील अंत्यसंस्कार स्थळे आणि स्मशानभूमीच्या संचालकांनी सांगितले कि, अशी परिस्थिती कधीही पाहिली नव्हती. मृतदेहांचे अंतिम संस्कार रात्रीदेखील केले जात आहेत. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत 90 हजारांहून अधिक लोक संक्रमित झाले असून अडीच हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, न्यूयॉर्क शहरातील कोरोना विरुद्ध लढाईत सामील असलेले भारतीय वंशाचे डॉक्टर कृष्णा कुमार यांनी शहरातील भीषण दृश्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “आपत्कालीन कक्षात लोक मरत आहेत, ही भयानक परिस्थिती आहे. रूग्णालयांच्या कॉरिडोरमध्ये रुग्ण पडत आहेत. शव वाहून घेण्यासाठी फ्रीझर ट्रक रुग्णालयांच्या बाहेर उभे असतात.

पहिल्यांदा अँटीबॉडी चाचणीस मंजुरी

ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने पहिल्या कोरोना विषाणूच्या अँटीबॉडी चाचणीस मान्यता दिली. यामुळे कोरोनामधून बरे झालेल्या लोकांना या संसर्गाचा सामना करण्यास त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिसाद समजण्यास मदत होईल. दुसरीकडे, व्हाईट हाऊसचे फिजीशियन सीन कोनले म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांची कोरोना विषाणूची तपासणी दुसऱ्यांदा नकारात्मक झाली आहे. ते पूर्णपणे स्वस्थ आहे. ट्रम्पची तपासणी नवीन रैपिड-प्वाइंट-ऑफ-केयर टेस्टद्वारे झाली. याचा परिणाम अवघ्या 15 मिनिटांत होतो.