डोनाल्ड ट्रम्प यांनी PM नरेंद्र मोदींकडे केली ‘ही’ विनंती, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असून आतापर्यंत 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 हजार 452 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. अमेरिकेत तीन लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात भारताने औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, आता अमेरिकेने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधी अमेरिकेला द्यावी अशी विनंती नरेंद्र मोदींना केली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदींशी बोलून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन देण्याची विनंती केली. ट्रम्प यांनी शनिवारी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोललो. भारतात मोठ्या प्रमाणात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन तयार होते. भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने 25 मार्च रोजी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. परंतु भारतावर अमेरिकेच्या विनंतीला मान देवून औषध पुरवण्याचे मान्य केले आहे.

अमेरिकेसह जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस किंवा उपचारात्मक उपचार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही प्रारंभिक निकालांच्या आधारे, ट्रम्प प्रशासन कोरोनाव्हायरसच्या यशस्वी उपचारांसाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन नावाच्या जुन्या मलेरिया औषधाचा वापर करण्यास अनुकूल आहे. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या त्वरित तात्पुरती मंजुरीनंतर न्यूयॉर्कमधील रूग्णांच्या उपचारासाठी मलेरिया औषधासह काही अन्य औषधाच्या औषधाचा उपयोग केला जात आहे. ट्रम्प यांच्या मते हे औषध सकारात्मक परिणाम देत आहे. कोरोनाव्हायरसच्या उपचारामध्ये हे एक यशस्वी औषध आहे. अमेरिकेने यापूर्वी सुमारे 29 दशलक्ष डोस साठवले आहेत.