महाभियोगाच्या तपासावर डोनाल्ड ट्रम्प ‘आक्रमक’, म्हणाले – ‘देश सध्या सलाईनवर, यापुर्वी कधीही असं झालं नव्हतं’ (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेचा दुरुपयोग केल्या प्रकरणी महाभियोगाची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान अध्यक्षांनी आपल्या समर्थकांना सांगितले की, आपला देश सलाईनवर आहे, असे पहिल्यांदा कधी झाले नाही. ट्रम्प यांनी शनिवार ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत डेमोक्रेटिक सभासद तपासासाठी आक्रमक पद्धत वापरत असल्याचा आरोप केला.

डेमोक्रेटिक सदस्यांनी ट्रम्प यांच्यावर 2020 च्या अध्यक्षीय निवडणूकीत त्यांच्या विरोधात लढणाऱ्या जो बिडेन यांचे नुकसान करण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्रपतींबरोबर हात मिळवला होता असा आरोप लावला आहे. यावर ट्रम्प म्हणाले की डेमोक्रेटमुळे अमेरिकनांच्या आधिकारांना धोका आहे, ते तुमचे आधिकार काढून घेऊ इच्छित आहेत. ते तुमचे आरोग्य काढून घेऊ इच्छित आहेत, ते तुमचा मताधिकार, तुमचे स्वतंत्र काढून घेऊ इच्छित आहेत.

ट्रम्प म्हणाले, आपले देश सलाईनवर आहे 
ट्रम्प म्हणाले की आपला देश या प्रकारच्या सलाईनवर आहे जो कधीच नव्हता. ते मला रोखू इच्छित आहेत कारण मी तुमच्यासाठी लढत आहे. परंतू मी असे कधीही होऊ देणार नाही.

अ‍ॅडम शिफने त्यांनी बदनाम केले
यानंतर ट्रम्प यांनी आणखी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की डेमोक्रेटिक सदस्य अ‍ॅडम शिफ यांनी त्यांना बदनाम आणि अपमानित केले. त्यांना काँग्रेसचा राजीनामा द्यायला हवा. अ‍ॅडम शिफ अमेरिकेचे अध्यक्षांच्या विरोधात महाभियोग तपासात नेतृत्व करत आहेत.

25 जुलै पासून सुरु झाला होता वाद
25 जुलैला युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांच्याबरोबर ट्रम्प यांचा झालेले संवाद सार्वजनिक झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरु करण्यात आली.

Visit : policenama.com