डोनाल्ड ट्रम्प यांची ‘तुर्की’ला धमकी ! सीरियामध्ये मर्यादा ओलांडली तर अर्थव्यवस्था लयास नेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली गेल्या काही वर्षांपासून सिरियावरून अमेरिका आणि तुर्की यांच्यात संघर्ष वाढतच चालला आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तुर्कीला सीरियाबद्दल धमकी दिली की उत्तर पूर्व सीरियामधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तिथे काही अनुचित प्रकार घडवल्यास ठीक होणार नाही. अमेरिकेने सोमवारी उत्तर – पूर्व सीरियाच्या सीमेवरुन आपले सैन्य माघारी घेण्यास सुरवात केली आहे.

उत्तर पूर्वेकडील सीमेवरून माघार घेत आहे अमेरिकन सेना
उत्तर पूर्व सीरियामधून अमेरिकन सैन्य माघार घेण्याची घोषणा व्हाईट हाऊसने रविवारी केली आहे. व्हाईट हाऊसने केलेल्या या घोषणेवर कायदा बनवणाऱ्या द्विपक्षीय गटानेही यावर टीका केली आहे. या भीतीनंतर तुर्कीमधून कुर्दीश सैन्यांवर हल्ला होऊ शकेल असा त्यांना संशय आहे.

https://twitter.com/Doranimated/status/1181130594585063424

… तर मी बर्बाद करून टाकेल
यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की जर तुर्कीने सीरियामध्ये असे काही केले जे आमच्यासाठी मर्यादेबाहेरचे असेल तर मी तुर्कीची अर्थव्यवस्था पूर्णपणे नष्ट करीन. ते म्हणाले की, इतर कोणत्याही देशांच्या कल्पनेपेक्षा अमेरिकेने जास्त काम केले आहे. यामध्ये आयएसआयचे साम्राज्य शंभर टक्के बंद करण्याचाही समावेश आहे. आता इतरांनी स्वत: चा परिसर वाचविण्याची वेळ आली आहे. अमेरिका महान आहे.

कुर्द लष्कराने अमेरिकेला घेरले
कुर्दिश लष्कराने या सर्व घटनांना पाटीवर वार केल्याचे संबोधले आहे. सिरियामधील इस्लामिक स्टेटशी युध्दात कुर्दिश-नेतृत्वाखालील सैन्याचा अमेरिका सर्वात महत्वाचा भागीदार आहे. कुर्द सेनेने अमेरिकेवर त्यांनी मित्रपक्षाला सोडून दिल्याचा आरोप केला आहे, ते म्हणाले की या निर्णयाचा युद्धातील दहशतवाद्यांविरूद्धच्या लढाईवर नकारात्मक परिणाम होईल.

 

Visit  :Policenama.com