नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय – अमेरिकन नीरा टंडन यांची पहिली कृष्णवर्णीय महिला म्ह्णून व्हाईट हाऊसच्या बजेट मॅनेजमेंट ऑफिसमध्ये (ओएमबी) संचालक पदावर नियुक्ती बाबत संशयाची स्थिती निर्माण झाली आहे. अध्यक्ष जो बायडन यांनी नीरा यांना या पदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यांची याच आठवड्यात सिनेटमध्ये सुनावणीनंतर नियुक्ती होणार आहे. तीन रिपब्लिकन आणि एका डेमोक्रॅटिक खासदारांच्या विरोधामुळे हा संशय निर्माण झाला आहे. या सर्व खासदारांनी नीरा टंडन यांचे इंटरनेट मीडियावरील वर्तन चुकीचे मानले आहे.

नीरा टंडन यांनी आपल्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी इंटरनेट मीडियावरून एक हजाराहून अधिक पोस्ट काढली आहेत. सुनावणीदरम्यान त्यांनी इंटरनेट मीडियावरील पोस्टबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. नीरा यांच्या नियुक्तीबाबत संशयावर व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी म्हणाले की, आम्ही विरोध करणाऱ्या सर्व खासदारांशी संपर्क साधत आहोत. आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. डेमोक्रॅटिक खासदारांची जी तक्रार आहे, ती देखील दूर केली जाईल.

रिपब्लिकन आणि काही डेमोक्रॅट करतायेत विरोध

ओहायोचे रिपब्लिकन खासदार रॉब पोर्टमन म्हणाले की, ते नीरा टंडनविरोधात मतदान करतील. रिपब्लिकन विधानसभेच्या अन्य दोन सदस्या सुसान कोलिन्स आणि मिट रोमनी यांनीही नीरा यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला आहे. डेमोक्रॅटिक खासदार जो मानचिन यांनी आधीच निषेध जाहीर केला आहे. माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात पोर्टमनने ओएमबी (ऑफिस ऑफ मॅनेजमेंट ऑफ बजेट) चे संचालक म्हणून काम पाहिले. सिनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक दोन्हींचे 50 – 50 खासदार आहेत.

आणखी एका भारतीयाची महत्त्वाच्या पदावर नेमणूक

जो बायडन प्रशासनाने ऊर्जा-तज्ज्ञ म्हणून भारतीय-अमेरिकी बिदिशा भट्टाचार्य यांना कृषी विभागात नियुक्त केले आहे. बिदिशाने भारताच्या ग्रामीण भागात सौरऊर्जेवर तीन वर्षे काम केले. ती फार्म सर्व्हिस एजन्सी (एफएसए) मध्ये सिनियर पॉलिसी अ‍ॅडवायजर म्हणून काम करेल. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीवर पदव्युत्तर आणि सेंट ऑल्फ कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांना अनेक संस्थेत विविध पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.