आगामी वर्षाच्या सुरुवातीस उपलब्ध होईल लस, अमेरिकेत 2.5 लाख लोक चाचणीसाठी ‘रेडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : अमेरिकेचे सर्वात मोठे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फासी यांनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोना विषाणूची लस तयार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी खासदारांना सांगितले की, जवळपास अडीच दशलक्ष लोक क्लिनिकल चाचण्यांमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक आहेत. शुक्रवारी झालेल्या संसदीय सुनावणीदरम्यान, इतर अधिकाऱ्यांसह, फासी यांनी कबूल केले की, उर्वरित लोकांचा कोरोना चाचणी अहवाल दोन ते तीन दिवसात येऊ शकत नाही. त्यासोबतच त्यांनी अमेरिकन लोकांना मास्क घालणे, गर्दी टाळणे आणि वारंवार हात धुणे यासारख्या मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोगांचे प्रमुख फासी म्हणाले की, ‘आम्हाला या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस लस मिळण्याची खात्री आहे. मला वाटत नाही की ते एक स्वप्न आहे. माझा विश्वास आहे की, हे एक वास्तव आहे आणि ते पूर्ण होताना दिसेल. ‘

व्हाइट हाऊसच्या आदेशानुसार फेडरल हेल्थ एजन्सीज आणि संरक्षण विभागाने ऑपरेशन वार्प स्पीडअंतर्गत 30 कोटी लस तयार करण्याची घोषणा केली आहे. या ऑपरेशनचा हेतू प्रथम कोरोना विषाणूची लस तयार करणे, नंतर त्याचे उत्पादन आणि वितरण करणे हा आहे. दरम्यान, जेव्हा ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे याची हमी एफडीएने दिली असेल तेव्हाच ही लस लागू केली जाईल.

दुसरीकडे, लस चाचणीवर रशिया मोठा दावा करत आहे. रशियन आरआयए न्यूज एजन्सीने एका अहवालाचे हवाला देत असे म्हटले आहे की, रशिया ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणात कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करीत आहे. आरोग्यमंत्री मिखाईल मुराशको म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध सामूहिक लसीकरण मोहीम राबवण्याची तयारी आहे. डॉक्टर आणि शिक्षकांना ही लस पहिल्यांदा दिली जाईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like