अमेरिका : Zoom वर व्हिडिओ कॉन्फरन्स करत होते वडील, मुलाने 20 जणांसमोर सपासप वार करून केला खून

वृत्तसंस्था – अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड पोलिसांनी एका मुलाला अटक केली असून त्याच्यावर आपल्या जन्मदात्या वडीलांचा खून केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या मुलानं झूमवर वडील व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये असताना 20 लोकांसमोर आपल्या 72 वर्षीय वडीलांचा खून केला. ड्वाइट पॉवर्स असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, 33 वर्षीय आरोपी मुलाने चाकूनं वडीलांवर सपासप वार करून खून केला.

सफोकॉल काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान वृद्ध व्यक्तीला खाली पडताना पाहून लोक घाबरले. त्याचवेळी त्यांनी स्किनवर कपडे नसलेल्या व्यक्तीला पाहिले. प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ज्याने हा हल्ला केला तो टक्कल पडलेली व्यक्ती होती. आणि त्याने कपडे देखील घातले नव्हते व त्याच्या डाव्या हातावर टॅटूही गोंदलेला होता. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीने पोलिसांनी खूनाची माहित दिली पण खून झाला ते ठिकाण त्यांनी माहित नव्हते. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीने काही वेळाने त्याचे पूर्ण नाव व पत्ता शोधून काढला.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोपीने खिडककीतून उडी मारून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला काही अंतरावरून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव थॉमस स्कुली पॉवर्स असल्याच सांगितले. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना तो जखमी झाला असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.