अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष पत्नीसह झाले ‘वाढपी’ (व्हिडिओ)

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांचा जेवण वाढतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा  व्हिडिओ 2016 मधील ते राष्ट्राध्यक्ष असतानाचा आहे.

Obama y su familia se despiden de quienes les sirvieron por años… Lo hacen de la misma manera: Sirviendo. Que gran ejemplo!¿Quién es más importante, el que se sienta a la mesa o el que sirve?

Geplaatst door Diego Leonardo Mora op Zondag 1 januari 2017

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे एका हॉटेलमध्ये काम करत आहेत, असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ कोणत्या हॉटेलचा नाही. ओबामा  राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या घरी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसाठी भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी ओबामा यांनी स्वतः अधिकाऱ्यांना जेवण वाढले होते. ‘अनेक वर्षे देशाची सेवा केलेल्यांचे आभार मानत असताना ओबामा आणि त्यांचे कुटुंब’, असे या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे.

अमेरिकेत एक व्यक्ती जास्तीतजास्त दोन वेळाच राष्ट्रपती होऊ शकतो. त्यानंतर तो पुन्हा सक्रीय राजकारणात येऊ शकत नाही.  अमेरिकेचे दोनदा राष्ट्रपतीपद भूषवल्यानंतर बराक ओबामा यांचा कार्यकाळ 2017 साली संपुष्टात आला. त्यामुळे पत्नी मिशेलसह ते सार्वजनिक जीवनात विविध उपक्रम आणि प्रकल्पांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like