भारताला हिंदू राष्ट्र बनवत आहेत PM मोदी : जॉर्ज सोरोस

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अमेरिकेतील करोडपती समाजसेवी जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना भारताला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. त्यांनी काश्मीरमधील कलम 370 रद्द केले तसेच नागरिकत्व कायद्यावरून देखीलजॉर्ज यांनी मोदींवर चांगलीच टीका केली.

मिळालेल्या माहितीनुसार जॉर्ज हे देखील म्हणाले की, मोदींनी मुस्लीम लोकसंख्या जास्त असलेल्या काश्मीरमध्ये दंडात्मक उपाय केले आणि लाखो मुसलमानांना त्यांच्या नागरिकतेपासून वंचित करण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. तसेच जॉर्ज म्हणाले की आगामी काळात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यावरूनच संपूर्ण जगाची दिशा ठरणार आहे. सध्या व्लादिमीर पुतिन, ट्रम्प आणि जिनपिंग हे हुकूमशहा प्रमाणे एखादे शासक आहेत.

सध्या आपण इतिहासाच्या बदलामधील कालखंडातून जात असल्याचे देखील जॉर्ज म्हणाले. यावेळी जॉर्ज यांनी आपल्या महत्वाच्या प्रोजेक्ट बाबत देखील चर्चा केली. ते म्हणाले की आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा प्रोजेक्ट ओपन सोसाइटी यूनिवर्सिटी नेटवर्क (ओएसयूएन) हा आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये जगभरातील सर्व युनिव्हरसिटीमधील लोक संशीधन करू शकतील.

फेसबुक पेज लाईक करा –