भारतानंतर अमेरिकेनं दिला चीनला मोठा झटका, सुरक्षा उपकरणांच्या निर्यातीवर घातली बंदी

वॉशिंग्टन : भारताने 59 चीनी अ‍ॅपवर बंदी आणल्यानंतर आता अमेरिकेने सुद्धा चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने चीनच्या हाँगकाँगबाबत राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणण्याची घोषणा केल्यानंतर आता मुळ अमेरिकेची असलेली अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीयो यांनी या बंदीची घोषणा केली.

पोम्पीयो यांनी ट्विट करून म्हटले की, आज अमेरिका हाँगकाँगला संरक्षण उपकरणे आणि पुनर्वापराच्या संवेदनशील तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर बंदी घालत आहे. जर बिजिंग आता हाँगकाँगला वन कंट्री, वन सिस्टमच्या रूपात मानते, तर आम्हाला असे केलेच पाहिजे. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत सुद्धा अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांनी चीनवर जोरदार हल्ला चढवला होता.