COVID-19 च्या संक्रमितांवर उपचार होण्याची अपेक्षा, सुरूवातीच्या परिक्षणात यशस्वी झाली ‘कोरोना’ वॅक्सीन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, या दरम्यान अमेरिकेतून एक चांगली बातमी समोर आली आहे. येथील कोरोना विषाणूच्या लस विकसित करण्यासंदर्भात ‘मोडर्ना’ या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने दावा केला आहे की लोकांमध्ये लसीच्या सुरुवातीच्या परीक्षणाचे परिणाम खूप आशादायक आले आहेत.

आठ लोकांना लसीचे दोन-दोन डोस देण्यात आले

कंपनीने म्हटले आहे की आठ निरोगी स्वयंसेवकांना लसी देण्यात आल्या असून त्यांचे निकाल आशादायक आले आहेत. प्रत्येक स्वयंसेवकांना लसचे दोन-दोन डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही चाचणी सुरू झाली. कंपनीने म्हटले आहे की ज्या लोकांना डोस दिले गेले त्यांच्या शरीरात अँन्टीबॉडी बनविल्या गेल्या, ज्याची प्रयोगशाळेत चाचणी केली असता विषाणूची पुनरावृत्ती होण्यापासून रोखण्यात ते सक्षम होते. यानंतर या अँटीबॉडीजची पातळीची जुळवणी त्या लोकांच्या अँटीबॉडीजच्या पातळीशी करण्यात आली जे कोरोना विषाणूमुळे ग्रस्त झाल्यानंतर बरे झाले आहेत.

तिसरा टप्पा जुलैमध्ये सुरू होईल

मॉडर्ना ने म्हटले की ते चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात 600 लोकांचा समावेश करतील ज्याची लवकरच सुरुवात होईल. परीक्षणाचा तिसरा टप्पा जुलैमध्ये सुरु होईल ज्यात हजारो लोकांचा समावेश असेल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॉडर्नाला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात जाण्यास मान्यता दिली आहे.

या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होईल लस

ही चाचणी यशस्वी झाल्यास या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस ही लस मोठ्या प्रमाणात वापरण्यासाठी उपलब्ध होईल, असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जॅक्स यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची कंपनी युद्धपातळीवर लसींच्या विकासामध्ये गुंतली आहे आणि लाखो डोस तयार करत आहे. त्यांनी दावा केला की ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.

…तर होईल विषाणूचा नाश

मॉर्डनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की कंपनी सध्या उच्च डोसला आपल्या चाचण्यांपासून दूर ठेवेल. असे यामुळे नाही की औषधाचे दुष्परिणाम पाहिले गेले होते, याचे कारण म्हणजे मध्यम डोसनेच चांगले परिणाम मिळाले आहेत. ते म्हणाले की जर ही लस तिसर्‍या परीक्षणातही यशस्वी झाली तर साथीचा रोग बनलेल्या कोरोना विषाणूचा लवकरच नाश होईल आणि पुन्हा लोक पूर्वीसारखे सामान्य जीवन जगू शकतील.