Bhavya Lal News : नासाच्या कार्यकारी प्रमुख बनल्या मुळ भारतीय वंशाच्या भाव्या, त्यांच्याबाबत जाणून घेवूयात सर्वकाही

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारतीय-अमेरिकन भाव्या लाल यांना सोमवारी नासाद्वारे अमेरिकी अंतराळ एजन्सीच्या कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. भाव्या लाल अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याद्वारे नासात बदलांसबंधी आढावा दलाच्या सदस्या आहेत. त्या बायडेन प्रशासनांतर्गत एजन्सीत परिवर्तनासंबंधी काम पहात आहेत.

बायडेन प्रशासनात आणखी एक भारतीय महत्वाच्या पदावर
अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने एका वक्तव्यात म्हटले आहे की, लाल यांच्याकडे अभियांत्रिकी आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा व्यापक अनुभव आहे. भाव्या अंतराळ तंत्रज्ञान आणि धोरण समुदायाच्या सक्रिय सदस्य सुद्धा आहेत. नासाने एक वक्तव्य जारी करून म्हटले की, भाव्या लाल यांनी इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स अनालिसीस सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूटमध्ये 2005 ते 2020 पर्यंत रिसर्च स्टाफ म्हणून काम केले आहे.

अनेक मोठ्या पदावर केले आहे काम
भाव्या स्पेस तंत्रज्ञान आणि पॉलिसी कम्युनिटीच्या अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहेत. त्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्या पॅनल सायन्स अध्यक्षा, सहअध्यक्षा होत्या. भाव्या यापूर्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान रिसर्च आणि कन्स्टल्टन्सी फर्म सी-स्टेप्स एलएलसीच्या अध्यक्ष सुद्धा होत्या.

स्पेस सेक्टरमध्ये मोठे योगदान
भाव्या यांनी स्पेस सेक्टरमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्या इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ अस्ट्रोनॉटच्या सदस्या होत्या. भाव्या यांनी प्रतिष्ठित Massachusetts Institute of Technology मधून सायन्स आणि तंत्रज्ञान विषयात मास्टर्सची डिग्री घेतली आहे. त्यांनी पब्लिक पॉलिसीमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठातून पीएचडीची डिग्री प्राप्त केली आहे.