भारतीय वंशाच्या माला अडीगा बनल्या जो बायडेनच्या पत्नी जिलच्या पॉलिसी डायरेक्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी जिलसाठी भारतीय वंशाची अमेरिकन महिला माला अडीगा यांची पॉलिसी डायरेक्टर म्हणून नेमणूक केली आहे. अडीगाने बायडेन -कमला हॅरिस मोहिमेसाठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. या अगोदर, अडीगा बायडेन फाउंडेशनमध्ये उच्च शिक्षण आणि सैन्य कुटुंबांसाठी संचालक होती. यापूर्वी ओबामा प्रशासनाच्या काळात शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य क्षेत्रातील सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी जागतिक महिलांशी संबंधित कार्यालयातील कर्मचारी प्रमुख आणि राजदूत वरिष्ठ सल्लागार म्हणून काम पाहिले.

इलिनोईसची रहिवासी अडीगाने मिनेसोटा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या ग्रिनेल कॉलेजमध्ये आणि स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तसेच शिकागो लॉमधून शिक्षण घेतले. 2008 मध्ये ओबामा यांच्या मोहिमेच्या संघात सामील होण्यापूर्वी, अडीगा यांनी शिकागोच्या एका लॉ फर्ममध्ये काम केले. ओडिगाने सुरुवातीला असोसिएट अटर्नी जनरलचे वकील म्हणून ओबामा प्रशासनात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अडीगा व्यतिरिक्त, बायडेन यांनी आणखी चार लोकांना व्हाइट हाउसचे वरिष्ठ कर्मचारी म्हणून नियुक्त केले आहे.