भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेत निर्माण केले ‘रोजगार’, जाणून घ्या कोणत्या शहरात किती झाली ‘गुंतवणूक’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – भारताच्या 155 कंपन्यांनी अमेरिकेमध्ये 2200 करोड डॉलर (सुमारे 1.67 लाख करोड रुपये) ची गुंतवणूक केली आहे. कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) द्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेत समजले की, या कंपन्यांच्या गुंतवणुकीने संपूर्ण अमेरिकेमध्ये सुमारे 1.25 लाख लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. सीआयआयचा हा रिपोर्ट ’इंडियन रूट, अमेरिकन स्वायल 2020’ नावाने मंगळवारी जारी झाला.

20 राज्यांत भारतीय कंपन्यांची गुंतवणूक 10 करोड डॉलर
रिपोर्ट सांगतो की, मुळ भारतीय असलेल्या या 155 कंपन्या अमेरिकेच्या सर्व राज्यात व्यवसाय करत आहेत. काही प्रमुख शहरात जसे की टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यूजर्सी, न्यूयॉर्क आणि फ्लोरिडामध्ये या कंपन्यांनी सर्वात जास्त लोकांना रोजगार दिला आहे. कंपन्यांनी कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) आणि शोध आणि विकासावर अनुक्रम 17.5 करोड आणि 90 करोड डॉलर खर्च केला आहे. 20 राज्यांत भारतीय कंपन्यांची गुंतवणूक 10 करोड डॉलर (सुमारे 760 करोड रूपये) पेक्षा जास्त आहे. 77 टक्के भारतीय कंपन्यांनी पुढे गुंतवणूक वाढवण्याची योजना बनवली आहे. 83 टक्के कंपन्या पुढील पाच वर्षात आणखी जास्त स्थानिक लोकांना नोकरी देण्याचे उद्दीष्ट घेऊन वाटचाल करत आहेत.

अमेरिकेत भारतीय कंपन्यांनी फार्मा, टेलीकम्युनिकेशन, एयरोस्पेस व डिफेन्स, आर्थिक सेवा, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोटिव्हसह अनेक सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे.

या शहरात दिला सर्वात जास्त रोजगार

शहर    रोजगार

टेक्सास 17,578

कॅलिफोर्निया 8,271

न्यूजर्सी 8,057

न्यूयॉर्क 6,175

फ्लोरिडा 5,454

या शहरांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक

शहर गुंतवणूक (करोड रुपये)

टेक्सास 72,230

न्यूजर्सी 18,247

न्यूयॉर्क 13,685

फ्लोरिडा 6,956

मॅसाचुसेट्स 6,637