भारतीय वंशाचे डॉ. दवे यांची न्यूयॉर्क शहराच्या नवीन आरोग्य आयुक्तपदी नेमणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील नवीन आरोग्य आयुक्तपदी भारतीय वंशाच्या डॉ. दवे ए चोकशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दवे यांच्या नेमणूकीची घोषणा करताना शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ म्हणाले की, ते कोरोना महामारीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ३९ वर्षीय डॉ. दवे यांना मंगळवारी न्यूयॉर्क शहराच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजिनचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. डॉ. ऑक्सीरिस बार्बोट यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले.

महापौर ब्लासिओ हे एका पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘डॉ. दवे यांचा उत्तम इतिहास आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आपल्या शहरातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे नेतृत्व करण्यास मदत केली. मला ठाऊक आहे की, नागरिकांना निरोगी राहण्यासाठी आपला संघर्ष पुढे नेण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहेत.’ डॉ.दवे यांनी सांगितले की, त्यांचे आजोबा गुजरातमधील छोट्याशा गावातून मुंबईत स्थायिक झाले होते. यानंतर त्यांचे वडील अमेरिकेतील लुसियाना येथे स्थायिक झाले. येथेच त्यांचा जन्म झाला आणि शिक्षण झाले.

२०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सार्वजनिक आरोग्यविषयक सल्लागार समूहात डॉ. दवे यांचा समावेश केला होता. चोकशी म्हणाले, “माझ्या आयुष्यात आतापर्यंत सर्वात अभूतपूर्व सार्वजनिक आरोग्याच्या संकटाला तोंड देण्याच्या आमच्या पद्धतींचा मला फार अभिमान आहे.” ते पुढे म्हणाले की, न्यूयॉर्क शहरातील लोकांची सेवा केल्याबद्दल मला अभिमान वाटत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्क शहरात कोरोनाची २८,७१० प्रकरणे आढळली आहेत आणि या विषाणूमुळे २,५०७ लोकांचा मृत्यू झाला आहे. चोकशी म्हणाले की, ही जागतिक महामारी आजार आणि अन्याय यांच्या दुष्परिणामांचे सर्वात ताजे उदाहरण आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like