अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या प्रमुख दावेदारांमध्ये भारतीय वंशाच्या सीनेटर कमला हॅरिस !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जो बिडेन लवकरच आपल्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. बिडेन यांच्या मोहिमेने अद्याप उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले की 10 ऑगस्टपूर्वी घोषणेची शक्यता नाही.

अध्यक्षपदाचे उमेदवार बिडेन, डेमोक्रॅट लवकरच करणार अधिकृत घोषणा

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डेमोक्रॅट त्यांचे चर्चासत्र घेतील आणि अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून बिडेन यांच्या नावाची औपचारिक घोषणा करतील. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा सहसा परिषदेच्या एक दिवस आधी केली जाते.

बिडेनच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा शोध अंतिम टप्प्यात

बिडेन लवकरच उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्याच्या शर्यतीत भाग घेणाऱ्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या प्रक्रियेचा हा सर्वात महत्वाचा भाग असतो. प्रमुख दावेदारांमध्ये भारतीय वंशाच्या कॅलिफोर्नियाच्या सीनेटर कमला हॅरिस, कॅलिफोर्नियाची प्रतिनिधी कारेन बास आणि ओबामा यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसॅन राईस या आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like