वर्णभेदाविरूध्दच्या लढाईसाठी 3.7 कोटी डॉलर देणार Google, सुंदर पिचाई यांनी केली घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी वर्णभेदाविरूद्धच्या लढाईत ३.७ कोटी डॉलरचे योगदान देण्याची घोषणा केली आहे. आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल संपूर्ण अमेरिकेत निदर्शने सुरू असताना त्यांनी ही घोषणा केली.

सर्व कर्मचार्‍यांना बुधवारी पाठवलेल्या ईमेलमध्ये गूगल आणि अल्फाबेटच्या भारतीय-अमेरिकन सीईओने प्रत्येकाला आवाहन केले कि ते ‘मारल्या गेलेल्या कृष्णवर्णीयांच्या स्मृतीनिमित्त आणि सन्मानार्थ ८ मिनिटे ४६ सेकंद शांतता पाळावी आणि एकता दाखवा.’

शांततेच्या कालावधीबाबत पिचाई म्हणाले, जॉर्ज फ्लॉइड मृत्यूच्या आधी श्वास घेण्यासाठी इतकाच वेळ धडपडत होता. हे फ्लॉयड आणि इतरांवर झालेल्या अन्यायची आपल्याला आठवण करून देईल.

पिचाई म्हणाले की, वर्ण असमानतेविरुद्ध लढा देणार्‍या संस्थांना मदत करण्यासाठी १.२ कोटी डॉलर्स दिले जातील, तर २.५ कोटी डॉलर रकमेच्या स्वरूपात अनुदान म्हणून दिले जातील, जेणेकरून वर्ण अन्यायविरूद्ध लढणार्‍या संघटनांना मदत होईल आणि महत्वाची माहिती मिळू शकेल.

सीईओने मेलमध्ये लिहिले की, ‘आपल्या समाजात कृष्णवर्णीय लोक अडचणीत आहेत. आपल्यातील बरेच लोक त्यांच्या भावनांच्या आधारे त्यांच्यासोबत उभे राहण्याचे आणि ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांच्याशी एकता दाखवण्याचे मार्ग शोधत आहेत.

मंगळवारी मी आमच्या कृष्णवर्णीय नेत्यांच्या एका गटाशी संवाद साधला आणि पुढचा रस्ता काय असेल आणि गुगल यात कशी मदत करू शकेल, हे जाणून घेतले. आम्ही बर्‍याच कल्पनांवर चर्चा केली आणि आम्ही मार्ग काढत आहोत कि येत्या आठवड्यात, महिन्यांत आणि भविष्यात आपण कुठे लक्ष द्यावे.’

जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल अमेरिकेत लोकांचा संताप कमी होत नसून सलग नवव्या दिवशी निषेध व हिंसाचार चालू राहिला. न्यूयॉर्क शहरात दोन पोलिस अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्याची आणि एकाला चाकूने मारल्याची माहिती मिळत आहे.

राजधानी वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसजवळ हजारो आंदोलक एकत्र झाले आणि मोबाइल फोनच्या प्रकाशात पोलिसविरोधी घोषणा देखील दिल्या. इतर शहरांमध्येही आंदोलने होत असल्याचे पाहायला मिळाले.