‘अमेरिका – इराण’ मधील तणावाचा भारतावर ‘परिणाम’ होणार ? , जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन सैनिकांकडून इराणचे बाहुबली जनरल कासिम सुलेमानी यांना मारल्यानंतर इराण आणि अमेरिकेमध्ये खूप तणाव वाढला आहे आणि याचा परिणाम बाकी देशांवर देखील पहायला मिळत आहे. भारत मध्य पूर्व आशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जर या क्षेत्रात तणाव वाढला तर भारताच्या व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होईल.

विकासाचा वेग मंदावेल
जर अमेरिका आणि इराकमधील तणाव असाच राहिला तर त्याचा मोठा परिणाम भारताच्या व्यापार व्यवस्थेवर दिसून येणार आहे. जर या तणावाचे रूपांतर युद्धात झाले तर इंधनात मोठ्या प्रमाणावर दरवाढ होऊ शकते. तसेच गरजेच्या वास्तूंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते आणि याचा ऐकून परिणाम देशाच्या विकासावर मोठ्या प्रमाणत झालेला पहायला मिळू शकतो.

आर्थिक नुकसान देखील होऊ शकते
अमेरिका आणि इराकमधील तणावामुळे इंधन दरवाढ होईल आणि देशातील नागरिकांना इंधनासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. ज्यामुळे सरकारला देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. जर दोनीही देशामध्ये तणाव वाढला तर त्याचा सरळ परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे.

देशात इंधन कमतरता जाणवेल
गेल्या काळात ड्रोनद्वारे तेल खाणींवर हल्ले झाल्यानंतर भारतात इंधनाचे दर वाढायला लागले होते आणि इंधनाचा तुटवडा देखील जाणवेल अशी शंका वर्तवली जात होती. सध्याच्या घडीला भारताकडे आपत्कालीन इंधन साठा 3.91 कोटी बॅरल इतका आहे. जो की 9.5 दिवस इतकाच चालू शकतो. त्यामानाने चीनकडे जवळजवळ 55 कोटी बॅरल इतका प्रचंड साठा आहे. तर अमेरिकेकडे 64.5 कोटी बॅरल इतका साठा आहे.

महागाई वाढू शकते
इंधन दरवाढीचा परिणाम आयात निर्यात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात पडू शकतो परिणामतः मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. एकीकडे देशात बेरोजगारी वाढत आहे आणि बँकिंग व्यवस्था देखील कमकुवत होत चालली आहे. अशात इंधन कमतरतेमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. तसेच महागाईसोबत विमान प्रवास देखील मोठ्या प्रमाणात दर वाढ होऊ शकते.

चाबहार पोर्ट वाचवण्याचे आव्हान
भारताने इराणच्या चाबहार पोर्टमध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. भारताचा हा प्रयत्न आहे की इराणमार्गे अफगाणिस्थानसोबत थेट संपर्क प्रस्तापित केला जाऊ शकतो. यामुळे भारत इराणकडून अफगाणिस्थान येथे जाणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीसाठी मदत करत आहे.

यावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
सरकारकडून या समस्यवर दोन्ही देशांमध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि यासाठी 47.6 मिलियन बॅरल डॉलरच्या संयुक्त क्षमतेसोबत दोन नवीन साठे निर्मितीची योजना सुरु आहे. तसेच भारताने इराणच्या समुद्रात आपल्या इंधन बोटींना सुरक्षा मिळावी यासाठी काही बोटी देखील तैनाद केलेल्या आहेत. तसेच सौदी अरेबिया सारख्या देशांशी देखील भारताने आपले संबंध व्यवस्थित ठेवलेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/