2 दिवस भारतात फिरली इव्हांका ट्रम्प,अमेरिकेत पोहचल्याबरोबर म्हणाली नरेंद्र मोदी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील अहमदाबाद शहरात 24 फेब्रुवारीला नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्पसुद्धा होती. ती वडील आणि कुटुंबासह दोन दिवस भारतात राहिली आणि फिरली. यानंतर ती कुटुंबासोबत अमेरिकेत परत गेली. जशी ती अमेरिकेत पोहचली, तिने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हणाली इव्हांका जाणून घेवूयात.

इव्हांका डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार
इव्हांका ट्रम्पने अरबपती व्यापार्‍यांशी विवाह केला आहे आणि तिला तीन मुले सुद्धा आहेत. घरची जबाबदारी सांभाळण्यासह ती राष्ट्राध्यक्षांची सल्लागार सुद्धा आहे. इव्हांकासुद्धा दोन दिवस भारतात थांबली होती आणि तिने भारतातील अनेक स्थळांना भेटी दिल्या. अहमदाबादनंतर ती उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात ताजमहल पाहण्यासाठी गेली. नंतर ती दिल्लीत आली, जेथे ती राष्ट्रपती भवनात आयोजित डिनरमध्ये सहभागी झाली होती.

अमेरिकेत पोहचल्यानंतर काय म्हणाली इव्हांका
25 फेब्रुवारीला इव्हांका ट्रम्प आपल्या वडीलांसोबत अमेरिकेसाठी रवाना झाली. 26 फेब्रुवारीला सायंकाळी ती अमेरिकेत पोहचली. अमेरिकेत पोहचताच तिने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. इव्हांकाने लिहिले की, नरेंद्र मोदी तुमच्या पाहुणचाराबद्दल आभारी आहे. आम्ही तुमचा सुंदर भारत देश पाहिला आणि येथे भारत – अमेरिका ऐक्य आणि संवादाचा जल्लोष साजरा केला. आम्ही सूंपर्ण दौर्‍यात मानवी सर्जनशीलता आणि मानवी हृदयाच्या अनंत क्षमातांची उदाहरणे पाहिली.

You might also like