जाणून घ्या कोण आहे टिफनी ट्रम्प, अमेरिकेत आंदोलनकर्त्यांना करतेय ‘सपोर्ट’

वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर तेथे होत असलेली हिंसक निदर्शने रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करत आहेत. उग्र रूप धारण करत असलेले हे आंदोलन शांत करण्यासाठी त्यांनी लष्कराला पाचारण करण्याचे वक्तव्य सुद्धा केले होते. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्पने सुद्धा या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

ट्रम्प यांच्या मुलीने समर्थन दिल्याने आंदोलनकर्ते खुश आहेत, मात्र ट्रम्प यांच्यासाठी अडचणी वाढल्या आहेत. आता असे म्हटले जात आहे की, टिफनी अशाप्रकारे आंदोलनाचे समर्थन करून त्यांच्या आडचणी आणखी वाढवू शकते.

आतापर्यंत लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत इवांका हिलाच पहात आले आहेत, ती राजकारणातही सक्रिय आहे. पण आता टिफनीने समोर येऊन आंदोलनाला समर्थन देऊन ट्रम्प यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

आई आणि मुलीने ब्लॅक स्क्रीन पोस्ट करून व्यक्त केला संताप

अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर सतत आंदोलने होत आहेत. या आंदोलनाला जगभरातील लोक समर्थन देत आहेत. हिंसा आणि निदर्शने रोखण्यात आतापर्यंत ट्रम्प सरकारला अपयश आले आहे. आता या आंदोलनकर्त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्प आणि तिची आई मार्ला मॅपल्सने सुद्धा समर्थन दिले आहे.

कोण आहे टिफनी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 विवाह केले आहेत. त्यांच्या 5 संतती डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, इवांका, एरिक, टिफनी आणि बॅरन ट्रम्प आहेत. टिफनी यापैकीच एक आहे. ट्रम्प यांची दुसरी पत्नी मार्ला मॅपल्स यांची मुलगी टिफनी आहे. ट्रम्प यांनी मार्लाशी 1993 मध्ये विवाह केला होता. हा त्यांचा दुसरा विवाह होता. टिफनीची आई मार्ला अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडल होती. तिचे नाव अमेरिकेत प्रसिद्ध आहे. टिफनीचा जन्म 13 ऑक्टोबर 1993 रोजी झाला होता. तिचे नाव एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड टिफनीवरून ठेवण्यात आले होते. टिफनी कॅलिफोर्नियामध्ये मोठी झाली आणि तेथेच तिने शिक्षण घेतले. टिफनीची आई आणि ट्रम्प यांचा विवाह केवळ 6 वर्षे टीकला. यानंतर 1999 मध्ये दोघे विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर ट्रम्प यांनी मेलानियासोबत विवाह केला. मेलानिया आणि ट्रम्प यांच्या मुलाचे नाव बॅरन आहे.

राजकारणापासून आहे दूर

टिफनी अमेरिकेच्या राजकारणापासून दूर राहते. यामुळेच ती डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाइट हाऊसमध्ये कमी दिसते. टिफनीने राजकारण आणि आपल्या वडीलांच्या बिझनेसमध्ये स्वारस्य न दाखवता आपले करियर बनवण्याचा विचार केला. ती एक प्राणीमित्र आहे, तिला संगीताची आवड आहे. एकदा तिने संगीतात करियर करण्याचे ठरवले पण नंतर तिने पुन्हा अभ्यासाकडे लक्ष दिले. टिफनी आपला भाऊ आणि बहिण इवांकासोबतही कमी दिसते.

सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह

टिफनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर खुप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपले अनेक फोटो शयर करत असते. टिफनीचे हे फोटो लोकांना खुप पसंत पडतात. तिच्या इंस्टाग्रामवर संपूर्ण कुटुंबाचेही फोटो दिसून येतात. याशिवाय तिने डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतचेही अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

टिफनीला ओळखणारे सांगतात की, तिची लाइफस्टाइल एकदम सरळ आहे. पण तिला मेकअप आणि नवीन ड्रेस घालण्याचा छंद आहे. टिफनीने एकदा एक ड्रेस सेलमधून खरेदी केला होता, तो खुप स्वस्त होता, पण तो तिला आवडला होता. पण हा ड्रेस खास प्रसंगी घालण्यसारखा नाही, असे तिने म्हटले होते. मात्र, टिफनी हाच ड्रेस घालून एकदा रिपब्लिकन पार्टीच्या इव्हेंटमध्ये गेली होती.

व्हाइट हाऊसमध्ये कर्मचारी म्हणाला होता जाडी

2019 ची गोष्ट आहे, टिफनी कोणत्या तरी कारणासाठी व्हाइट हाऊसमध्ये होती, तेथे एका कर्मचार्‍याने तिला पाहिले आणि जाडी म्हणून कमेंट पास केली. टिफनीने ते ऐकले आणि आपले वडिल डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले, यांनतर ट्रम्प यांनी त्या कर्मचार्‍याला कामावरून काढू टाकले. विशेष म्हणजे ट्रम्प हे टिफनीसोबत फोटो क्लिक करण्यास टाळाटाळ करतात. टिफनीच्या इंस्टाग्रामवर जे ट्रम्प यांच्या सोबतचे फोटो आहेत ते 2016 सालातील आहेत.