चीनला ‘बर्बाद’ करण्याचा प्लॅन ‘रेडी’, अमेरिकेसोबत आलेल्या ‘या’ 8 देशांनी एकत्र उघडली ‘आघाडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेसह जगातील आठ लोकशाही देशांमधील ज्येष्ठ खासदारांनी आंतर संसदीय आघाडी सुरू केली आहे. चीनच्या वाढत्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, सुरक्षा आणि मानवी हक्कांना निर्माण होणार्‍या धोक्यांचा सामना करण्यासाठी ही युती सुरू केली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  आंतर संसदीय आघाडीला शुक्रवारी लाँच करण्यात आले. याला अश्या वेळी बनविण्यात आले, जेव्हा चीनचे वाढते आर्थिक व राजकीय प्रभुत्व कमी करण्यासाठी युती बनविण्यासाठी अमेरिका संघर्ष करत आहे. नुकतेच हाँगकाँगमध्ये  राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीच्या बीजिंगच्या निर्णयाचा निषेध करण्यात अमेरिकेने परदेशी सरकारांचे नेतृत्व केले होते, या कायद्यामुळे  शहराच्या स्वायत्ततेला धोका असल्याचे म्हंटले आहे.

या समुहाने नमूद केले की “पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइनाशी संबंधित मुद्द्यांबाबत योग्य आणि समन्वित प्रतिक्रिया निर्माण करणे आणि त्यासंदर्भात संबंधित मुद्द्यांबाबत एक सक्रिय आणि सामरिक दृष्टीकोन निर्माण करणे हे आपले लक्ष्य आहे.” अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर सदस्य मार्को रुबीओ आणि डेमोक्रॅट बॉब  मेनेंडेज़, जपानचे माजी संरक्षण मंत्री जनरल नाकाटानी, युरोपियन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य मिरियम लेक्झमन आणि ब्रिटनचे आघाडीचे खासदार इयान डंकन स्मिथ हे नव्याने सुरू झालेल्या गटाचे सह-अध्यक्ष आहेत. बीजिंगमधील सुप्रसिद्ध टीकाकार आणि अमेरिकेच्या बीजिंगमधील अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन करणारे खासदार रुबिओ यांनी ट्विटरवर एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, “चीन, चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटी अंतर्गत एक जागतिक आव्हान दाखवते. ”

बीजिंगने जोर देत म्हंटले – “चीनची वाढ जगासाठी धोका नाही”
बीजिंगने वारंवार सांगितले कि,  हाँगकाँगमधील परिस्थिती ही त्याची अंतर्गत समस्या आहे. तसेच चीनची  मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजनीतिक प्रगती, ही जगासाठी धोकादायक बाब नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.  गेल्या शुक्रवारी बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी सामान्य पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही राजकारण्यांच्या छोट्या गटाला वस्तुस्थितीचा आदर करण्यासाठीची  विनंती केली आहे, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सामान्य नियमांचा आदर करण्याची,  शीत युद्धाची विचारसरणी सोडण्याची, देशांतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे आणि स्वार्थासाठी राजकीय पावले उचलण्यापासून वाचण्याची विनंती केली आहे. ” दरम्यान, चीनविरूद्धच्या युतीमध्ये अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वीडन, नॉर्वे आणि युरोपियन संसदेतील खासदारांचा समावेश आहे.