धक्‍कादायक ! १८ कुत्र्यांनी मिळुन मालकाचेच लचके तोडले

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – अनेकदा आपल्या किंवा घराच्या सुरक्षतेसाठी कुत्र्यांना पाळले जाते. कारण असे म्हणतात की, ते घराचे रक्षण करतात आणि ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. काही झाले तरी कुत्रा आपल्या मालकाला विसरत नाही.  पण अमेरिकेमध्ये अशी भयानक गोष्ट घडली आहे. चक्क कुत्र्याने आपल्या मालकाला खाल्ल्याची घटना तिथे घडली आहे. घटनी कशी घडली ? आपण सविस्तर जाणून घेऊया…

अमेरिकेमधील टेक्सासमध्ये मॅक नावाचा व्यक्ती अनेक महिन्यांपासून बेपत्ता होता, असे समजले आहे की, या बेपत्ता झालेल्या व्यक्तीला १८ कुत्र्यांनी खाल्ले आहे. मेडिकल परिक्षकाने मंगळवारी माहिती दिली की, डिएनए टेस्टमधून अशी माहिती कळाली आहे की, कुत्र्याच्या जवळ आढळलेल्या हाडांच्या तुकडे ५७ वर्षाच्या फ्रेडी मॅकचे आहे. डिप्टी आरोन पिट्सने सांगितले की, १८ कुत्र्यांनी कपडे, केसासहित मॅकच्या पुर्ण शरीराला खाल्ले होते आणि तिथे २ ते ५ इंच हाडांच्या तुकड्यांशिवाय काहीच उरले नव्हते.

Dog-Eat-Owner

मॅक आजारी होते यामुळे अद्याप स्पष्ट झाले नाही की, कुत्र्यांनी त्यांना मारुन टाकले व त्यानंतर खाल्ले की ते मेल्यानंतर त्यांना खाल्ले. मे मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी मॅक बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती. नातेवाईकांनी सांगितले की, एप्रिलपासून आम्ही त्यांना पाहिले नव्हते.

जेव्हा नातेवाईक मॅकच्या घरी गेले तेव्हा कुत्र्यांनी त्यांना जाऊ दिले नाही. कुत्र्यांचे लक्ष विचलित झाल्यानंतर जेव्हा सरकारी अधिकारी मॅकच्या घरात गेले तेव्हा त्यांना मॅक दिसले नाही. पण घरात त्यांना व्यक्तीचे केस आणि हाडे आढळली तेव्हा त्यांनी त्या हाडांना डिएनए टेस्टसाठी पाठवले तेव्हा समजले की ते मॅक यांची हाडे होती. मॅकच्या १८ कुत्र्यांमध्ये दोन कुत्र्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी मारुन टाकले होते. ही घटना घटल्यानंतर १६ कुत्र्यांमधील १३ कुत्र्यांना मारून टाकले. राहिलेल्या तीन कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी ठेवले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !