भारतासाठी चांगले ठरू शकतात जो बायडन, अणू करारासह अनेक प्रकरणात दिली आहे साथ

नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन 1970 च्या दशहकापासनूच भारत-अमेरिकेमध्ये मजबूत संबंधांना महत्व देत आहेत. 2008 मध्ये दोन्ही देशांमध्ये अणू करारासाठी सीनेटची मंजूरी मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बाजावली होती. तसेच दहशतवादविरोधी अनेक विधेयकांचे त्यांनी समर्थन सुद्धा केले.

2001 मध्ये बायडन सीनेटच्या परराष्ट्र संबंधी समितीचे अध्यक्ष होते आणि तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना पत्र लिहून भारतावर लावलेले प्रतिबंध हटवण्याची मागणी केली होती. अणू कराराला अंमलबजावणीचे स्वरूप देताना जेव्हा दोन्ही देशात चर्चा सुरू होती तेव्हा बायडन सीनेटमध्ये भारताचे एक महत्वाचे सहकारी म्हणून उपस्थित होते. तो करार दोन्ही मजबूत लोकशाहीमधील संबंधी अधिक मजबूत करण्यासाठी पाया ठरला.

रणनिती प्रकरणांचे तज्ज्ञ पी.एस. राघवन यांनी म्हटले, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष असलेले जो बायडन यांचे संबंध विकसित करण्याच्या प्रक्रियेचे प्रमुख भाग होते. इंडो-पॅसिफिक भागीदारी ओबामा यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल डेमोक्रेटिक पार्टीचे नेते जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष कार्यकाळात त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सुद्धा उल्लेख केला.

बायडन उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जुलै 2013 मध्ये चार दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले होते, तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, तत्कालीन उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांना भेटले होते आणि दिल्लीमध्ये गांधी स्मृती संग्रहालयात सुद्धा गेले होते. ते मुंबईत सुद्धा आले होते, येथे त्यांनी व्यापारातील प्रमुखांची भेट सुद्धा घेतली होती आणि मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्य धोरणांवर भाषण दिले होते.

रणनीती संबंध झाले मजबूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2014 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले होते तेव्हा तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी त्यांच्यासाठी भोजन आयोजित केले होते. बराक ओबामा यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेमध्ये रणनिती आणि संरक्षण संबंधात विस्तार झाला आणि त्यामध्ये बायडन यांची महत्वाची भूमिका होती. ओबामा प्रशासनाने 2016 मध्ये भारताला अमेरिकेचा ‘प्रमुख संरक्षण भागीदार’चा दर्जा दिला होता.