कोरोना रूग्णांवर देखरेख ठेवण्याचा नवीन मार्ग, 500 रुग्णांवर केला गेला प्रयोग

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरस असलेल्या रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी संशोधकांनी एक नवीन मार्ग तयार केला आहे. त्यांनी टपाल तिकिटाच्या आकाराचे सेन्सर असलेले एक उपकरण तयार केले आहे जे शरीरात तापमान आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी रेकॉर्ड करू शकते. या डिव्हाइसचा वापर करून कोरोनाची सुरुवातीची चिन्हे देखील आढळू शकतात. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की, या नवीन यंत्राचा वापर 50 हून अधिक चिकित्सक, तज्ञ आणि रूग्णांवर करण्यात आला आहे. सायन्स अ‍डव्हान्स जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार हे स्टिकरसारखे वैद्यकीय उपकरण आहे, ज्याचा आकार टपाल तिकिटासारखा आहे. हे अत्यंत मऊ आणि लवचिक आहे. याला घश्याच्या खालच्या बाजूस लावले जाऊ शकते.

संशोधक म्हणतात की, या डिव्हाइसचा वापर करून श्वसन प्रणालीवर लक्ष ठेवले जाऊ शकते. या कामासाठी मान ही योग्य जागा आहे. या अभ्यासाशी संबंधित संशोधक जॉन ए रॉजर्स म्हणाले, ‘हे डिव्हाइस त्वचेवरील अगदी हलके कंप देखील शोधू शकते. तापासाठी याला तापमान सेन्सरयुक्त बनविले आहे. ते म्हणाले की, हे घालण्यायोग्य उपकरण श्वसन प्रणालीच्या आरोग्यावर तसेच खोकल्याची मोजणी करू शकते. या अभ्यासाचे नेतृत्व करणारे नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे संशोधक अरुण जयरामन म्हणाले, “आजारात लवकर रोग शोधण्यासाठी साधनांच्या विकासावर आपण एकत्र काम करत आहोत.”

यापूर्वी बर्‍याच देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांना शोधण्यासाठी आणखीन अनेक पद्धती वापरल्या जात आहात. तो कोठून आला, कोणाशी संपर्क साधला होता, प्रवासाच्या इतिहासासारख्या गोष्टी शोधल्या गेल्या, त्यानंतर या रुग्णांचा शोध लागला. आतापर्यंत जगात कोरोना विषाणूच्या रुग्णांना बरे करण्यासाठी लस सापडल्या नाहीत, यामुळे रुग्णांच्या संशोधनासाठी पावले उचलली जात आहेत. त्यासोबतच रुग्णांना शोधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांचा शोधही चालू आहे.