खासगी अंतराळ कंपनीनं देखील दाखवलं चंद्रावर सहलीला घेवून जाण्याचं ‘स्वप्न’, NASA नं केलं मनापासून ‘कौतूक’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकन खासगी कंपनी स्पेस-एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे डगलस हर्ले आणि रॉबर्ट बेनकेनच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याने अंतराळात जास्त लोकांना घेऊन जाणे आणि नवीन हालचाली सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे. जसे की, अंतराळ पर्यटन, कॉर्पोरेट रिसर्च आणि उपग्रहांची दुरूस्ती. यामुळे अंतराळात खासगी उद्योजकांनाही संधी प्राप्त होईल. अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाचे प्रमुख जिम ब्रिडेनस्टाइन यांनी प्रेस कॉन्फरंसमध्ये म्हटले, आपण अंतराळ प्रवासाच्या नव्या युगात प्रवेश करत आहोत. तो दिवस दूर नाही, जेव्हा नासा या सर्वांचा ग्राहक सुद्धा असेल, मालक आणि संचालक सुद्धा. अनेक ग्राहकांपैकी एक.

मेक्सिकोच्या खाडीत लँडींग
स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारनंतर फ्लोरिडाच्या जवळ मेक्सिकोच्या खाडीत ड्रॅगन कॅप्सूलचे लँडींग करण्यात आले. लँडिंगसाठी नारंगी आणि सफेद रंगाचे चार विशाल पॅराशूट वापरण्यात आले. लँडिंगनंतर ताबडतोब नासाची टीम बोटीने ड्रॅगन कॅप्सूलपर्यंत पोहचली. नासाच्या टीमला खासगी बोटींच्या एका मोठ्या ताफ्याशी झुंजावे लागले, ज्यावर लोक बसून स्पेसक्राफ्टला जवळून पहात होते. यापैकी एकाने तर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनासाठी बॅनरसुद्धा फडकवला.

तुमचे स्वागत आहे.
यशस्वी लँडिंगनंतर स्पेस-एक्सचे इंजिनियर मायकल हीमॅन यांनी अंतराळ प्रवाशांना म्हटले, पृथ्वीवर तुमचे स्वागत आहे. स्पेस-एक्समधून उड्डाणासाठी धन्यवाद. एक तासाभरानंतर दोघे अंतराळ प्रवाशी कॅप्सूलच्या बाहेर आले. बाहेर येण्यापूर्वी बेनकेन यांनी स्पेस-एक्स टीमला धन्यवाद देत म्हटले की, तुम्ही अशक्यला शक्य केले. बाहेर येताच दोघांना ह्यूस्टन येथील एका लष्करी तळावर नेण्यात आले. प्रोटोकॉलनुसार दोन्ही अंतराळ प्रवाशांना उपचारासाठी देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.

19 तासांचा प्रवास
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पृथ्वीचा हा प्रवास सुमारे 19 तासांत पूर्ण झाला. एखाद्या खासगी कंपनीने केलेला हा पहिला चमत्कार होता. 1975 नंतर प्रथमच अमेरिकेचे एखादे अंतराळ यान समुद्र पृष्ठभागावर उतरले.

नासाने दिली संधी
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या उड्डाणासाठी नासाने स्पेस-एक्स आणि बोईंगला संधी दिली होती. यामध्ये स्पेस-एक्सने बाजी मारली आहे. स्पेस-एक्सच्या चीफ आपरेटिंग ऑफिसर गायने शॉटवेल यांनी म्हटले, हे मिशन अविश्वसनीय प्रकारे यशस्वी झाले. ही तर सुरूवात आहे. आम्ही अंतराळ पर्यटनाची सुरूवात करत आहोत. आम्ही चंद्रावर आणि मंगळवार पर्यटनाचा विचार करत आहोत.

रविवारची सकाळ
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून शनिवारी सायंकाळी पृथ्वीसाठी रवाना झालेल्या या दोन अंतराळ प्रवाशांना झोपेतून रविवारी सकाळी ओळखीच्या आवाजाने जाग आली. मला आनंद आहे की तुम्ही अंतराळातून आलात. परंतु, यापेक्षा आनंद आहे की, तुम्ही घरी परतत आहात. हा हर्ले यांचा मुलगा जॅकचा आवाज होता. यानंतर बेनकेन यांची मुलगी थियोची पाळी होती. ती म्हणाली, उठा पप्पा उठा, उठा आता, मला पर्वा नाही, तुम्ही उद्या पण झोपू शकता.

राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आनंद
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून नासाचे अंतराळ मिशन यशस्वी झाल्याने आनंद व्यक्त करत सर्वांना धन्यवाद दिले.

पुढील उड्डाण सप्टेंबरमध्ये
स्पेस-एक्स मिशन औपचारिकरित्या यशस्वी जाहीर केल्यानंतर क्रू ड्रॅगनचे पुढील उड्डाण सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते. दुसरे उड्डाण फेब्रुवारी 2021मध्ये प्रस्तावित आहे, ज्यामध्ये या ड्रॅगन कॅप्सूलचा वापर होईल, जी आत्ताच अंतराळातून परतली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like