अमेरिकेतील विस्कोन्सिनमध्ये पुन्हा एकदा पोलिसच बनले भक्षक, कृष्णवर्णीयाला घातल्या 7 गोळया

वाशिंग्टन : कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लायडच्या मृत्यूनंतर चार महिन्यात पुन्हा एकदा अमेरिकेत पुन्हा हृदयाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ताज्या प्रकरणात सुद्धा एक कृष्णवर्णीय नागरिक आणि आणि आरोपी पोलीस कर्मचारी बनले आहेत. हे प्रकरण अमेरिकेच्या विस्कोंनिसनच्या केनोशा शहरातील आहे, जेथे पोलिसांनी कृष्णवर्णीय नागरिकाला सात गोळ्या मारल्या, नंतर त्यास अत्यावस्थ स्थितीत रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीचे नाव जॅकब क्लॅक आहे. जॉर्ज आणि जॅकबची सुरूवातीची कहानी खुप मिळती-जुळती असल्याचे वाटते.

जॉर्ज बाबत बोलायचे तर ती घटना 24 मे रोजीची होती, ज्यामध्ये सुमारे सहा मिनिटपर्यंत एका पोलीस कर्मचार्‍याच्या गुडघ्याखाली मान दबून राहिल्याने श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेच्या 40 राज्यात कर्फ्यू लावण्यात आला होता. अनेक जागांवर अनियंत्रित निदर्शकांची पोलिसांशी हिंसक हाणामारी सुद्धा झाली होती. तर जॅकबला गोळी मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलीसांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे. लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांना खूनी म्हटले.

विस्कोंनिसनचे गव्हर्नर टोनी इवर यांनी या घटनेचा निषेध केला. सोशल मीडियावरील व्हिडिओत पोलीस कर्मचारी कृष्णवर्णीय नागरिकावर गोळ्या मारताना दिसत आहेत. त्याच्यावर नेमक्या किती पोलिसांनी गोळ्या मारल्या हे अद्याप समजलेले नाही. व्हिडिओत गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. तीन पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखल्याचे दिसत आहे.

हा व्यक्ती एका कारचा दरवाजा उघडताच एक पोलीस त्याला मागून पकडतो आणि गोळ्या मारण्यास सुरूवात करतो. ही घटना रविवारी सायंकाळी पाचची आहे. एका पोलीस अधिकार्‍याने एक पत्रक जाहीर करून यास कौटुंबिक भांडण असल्याचे म्हटले आहे. यापेक्षा जास्त माहिती पोलिसांनी दिलेली नाही. विस्कोंनिसनचे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

सोमवारी घटनेच्या विरोधातील आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अश्रुधूरचा वापर केला. यावेळी शेकडो निदर्शक सहभागी झाले होते. तर रविवारी झालेल्या आंदोनात अनेक गाड्यांना आग लावण्यात आली, आणि काचा फोडण्यात आल्या. यानंतर येथे पूर्ण रात्रभर कर्फ्यू लावण्यात आला होता. स्वातची पथके रात्रभर आणि सोमवारी सकाळी रस्त्यावर तैनात होती.