अमेरिकेत कोरोनाचा कहर ! 24 तासात तब्बल 2 लाख नवे रुग्ण, मृतांच्या संख्येनेही मोडला रेकॉर्ड

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –    जगभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाउन करण्यात आला आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच आहे. महासत्ता असलेली अमेरिकादेखील कोरोनापुढे हतबल झाली असून, येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. अमेरिकेत एकाच दिवसात कोरोनाचे दोन लाख दहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. तसेच कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अमेरिकाही हतबल, रुग्णांची संख्या तब्बल एक कोटीवर

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गेल्या 24 तासांत 2 लाख 10 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 2 हजार 907 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही एक कोटी 40 लाख झाली आहे, तर मृतांची संख्या ही दोन लाखांहून अधिक झाली आहे. अमेरिका, भारत आणि ब्राझील या तीन देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येथील रुग्णांची संख्या ही सर्वांत जास्त आहे.

कोणतीही लस कोरोनाला रोखू शकत नाही, WHO प्रमुखांच्या विधानाने चिंतेत भर
कोरोनावर जगभरात संशोधन सुरू असून, लशीच्या चाचणीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी कोरोना लसीसंदर्भात मोठे विधान केले आहे. कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. WHO प्रमुखांनी कोरोना लसीसंदर्भात केलेल्या विधानामुळे चिंतेत भर पडली आहे. जगात कोरोनावर कोणतीही लस तयार केली गेली तरी ती कोरोना महामारी रोखू शकत नाही, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. तसेच लस आल्यानंतर ती काेरोनाशी लढण्यासाठी आपण वापरत असलेल्या इतर साधनांसोबत कोणतीही लस ही एक पूरक साधन म्हणूनच काम करेल. कोरोनाची लस आल्यानंतर ज्याचा आता वापर केला जात आहे, ती सर्व सिस्टिम रिप्लेस करेल असे होणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.