अमेरिकेच्या आण्विक शस्त्रागारांवर सर्वात मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, जाणून घ्या

नवी दिल्ली : अमरिकेच्या आण्विक शस्त्रांच्या साठ्याची देखरेख करणारे राष्ट्रीय आण्विक सुरक्षा प्रशासन (एनएनएसए) आणि ऊर्जा विभागा (डीओई) च्या नेटवर्कवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. दावा केला जात आहे की, या दरम्यान हॅकर्सने मोठ्या प्रमाणात गोपनीय फाइल्स चोरी केल्या आहेत. या सायबर हल्ल्यात किमान अर्धा डझन संघीय एजन्सीज प्रभावित झाल्या आहेत.

अमेरिकन मीडिया पॉलिटिकोच्या रिपोर्टनुसार, ऊर्जा विभागाचे मुख्य माहिती अधिकारी रॉकी कॅपियोन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. यानंतर राष्ट्रीय अणू सुरक्षा प्रशासन आणि ऊर्जा विभागाच्या टीमने हॅकिंगशी संबंधित सर्व माहिती युएस काँग्रेस समितीला पाठवली आहे. लवकरच सरकारकडून सुद्धा या प्रकरणात वक्तव्य जारी केले जाऊ शकते.

ज्या एजन्सीजमध्ये सुरक्षा अधिकार्‍यांनी संशयित हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत, त्यामध्ये न्यू मेक्सिको आणि वॉशिंग्टनची फेडरल एनर्जी रेगुलेटरी कमीशन (एफईआरसी), सँडिया राष्ट्रीय प्रयोगशाळा न्यू मेक्सिको आणि लॉस अलामोस राष्ट्रीय प्रयोगशाळा वॉशिंग्टन, राष्ट्रीय अणू सुरक्षा प्रशासनाचे सुरक्षित वाहतूक कार्यालय आणि रिचलँड फील्ड कार्यालयाचा सहभाग आहे. हे सर्व विभाग अमेरिकेच्या आण्विक शस्त्रांच्या साठ्याला नियंत्रित करतात आणि त्यांची सुरक्षा करतात.

अमेरीकन अधिकार्‍यांनी सांगितले की, हे हॅकर्स अन्य एजन्सिजच्या तुलनेत फेडरल एनर्जी रेग्युलेटरी कमीशनचे जास्त नुकसान करू शकतात. अधिकार्‍यांनी म्हटले, या एजन्सीच्या नेटवर्कमध्ये सर्वात जास्त घुसखोरीचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणात सायबर सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी हॅकिंग हालचालीशी संबंधीत तपासात अमेरिकन फेडरल सर्व्हिसेसला मदत करत आहेत. अमरीकेच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी प्रामुख्याने सायबर सिक्युरिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी एजन्सी (सीआयएसए) कडे असते. परंतु, ट्रम्प प्रशासनात या एजन्सीला खुप कमजोर करण्यात आले. तिचे माजी संचालक क्रिस्टोफर क्रेब्स यांच्यासह सीआयएसएच्या अनेक प्रमुख अधिकार्‍यांना ट्रम्प प्रशासनाने बाहेर केले आहे.