वैज्ञानिक चिंताग्रस्त ! ‘कोरोना’ व्हायरसवर WHO स्वत:च बनवू शकला नाही ‘गाइडलाईन्स’

जिनिव्हा : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे जगातील अनेक देश त्रस्त आहेत. सर्वात वाईट स्थिती अमेरिकेची आहे. आता अन्य देशांमध्ये सुद्धा कोरोनाची प्रकरणे वाढत चालली आहेत. या दरम्यान काही संशोधकांनी कोरोना व्हायरसबाबत डब्ल्यूएचओच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

संशोधकांचे म्हणणे आहे की, डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना कोरोना व्हायरसच्या प्रकरणात योग्य गोष्टी देशांच्या समोर आणू शकलेली नाही. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या मास्कची खुप गरज आहे, त्यालाच आवश्यक घोषित करण्याबाबत योग्य निर्णय देता आलेला नाही. संशोधकांनी म्हटले आहे की, जर संसर्गाला रोखायचे असेल तर चेहर्‍यावर मास्क असणे खुप जरूरी आहे. याशिवाय असे अनेक मुद्दे आहेत ज्याकडे डब्ल्यूएचओने योग्यवेळी लक्ष दिलेले नाही. यामुळे संसर्ग रोखण्यात समस्या निर्माण झाल्या.

संशोधकांचे म्हणणे आहे की, डब्ल्यूएचओ संपूर्ण जगासाठी काम करते. अनेक देश या संघटनेला संशोधनासाठी निधी देतात. जर एखादी महामारी समोर आलीतर संपूर्ण जग डब्ल्यूएचओकडे पाहात असते आणि त्यांच्याकडून जारी केलेले नियम आणि कायद्यांचे पालन केले जाते. पण कोरोना व्हायरसच्या प्रकरणात असे दिसून आले नाही. डब्ल्यूएचओ कोरोना व्हायरसच्या प्रकरणात झालेल्या संशोधनावरून सुद्धा योग्य निर्णय काढू शकलेले नाही, ज्यामुळे ही समस्या वाढली आहे.

मास्क

सर्व संशोधक आणि सरकारांनी कोरोना व्हायरस समोर आल्यानंतर मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. पण, डब्ल्यूएचओने अजूनही यास स्पष्टपणे आवश्यक असल्याचे म्हटलेले नाही. मास्कमुळे यापासून बचाव होऊ शकतो, यासाठी सर्वांनी मास्क घातला पाहिजे, हे सुद्धा डब्ल्यूएचओ सांगू शकलेली नाही.

लक्षणे नसणारे रूग्ण

याशिवाय डब्ल्यूएचओच्या एका सदस्याने हे देखील म्हटले की, लक्षणे नसलेले कोरोनाचे रूग्ण मिळणे शक्य नाही. काही दिवसानंतर पुन्हा त्यांनी याबाबत घुमजाव केले.

हवेतील पाण्याचे बिंदू महामारीचे वाहक नाहीत

डब्लूएचओने सतत सांगितले की, हवेतील छोटे पाण्याचे बिंदू किंवा एरोसोलमुळे महामारीचा प्रसार होत नाही. तर अनेक ठिकाणी डॉक्टरांनी सांगितले की, हे एरोसोल या आजाराचे कारक ठरू शकतात. चीनच्या संशोधकांनी अगोदरच म्हटले होते की, हा व्हायरस शिंकण्यामुळे आणि एकमेकाला स्पर्श केल्याने पसरू शकतो. अनेक संशोधकांनी सुद्धा यावर सहमती दर्शवली. परंतु, डब्ल्यूएचओने हे मान्य केलेले नाही.

मिनेसोटा विद्यापीठाचे एक संसर्गजन्य रोग तज्ज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी म्हटले आहे की, डब्लूएचओ हवेतील पाण्याचे सूक्ष्म कण आणि एरोसोलच्या मुद्द्यावर जगाच्या बहुतांश संशोधकांच्या शोधातून बाहेर पडले आहेत. संशोधक म्हणतात की, हे शक्य असूनही डब्ल्यूएचओ हे मान्य करत नाही. यामुळे लोकांचा डब्ल्यूएचओवरून विश्वास उडत चालला आहे.

अमेरिकेसह अनेक देशांनी लॉकडाऊनची निती अवलंबली, कारण त्यांना समजले की, केवळ आजारी लोकांना वेगळे ठेवून महामारी रोखणे पुरेसे नाही. जर व्हायरस हवेतील छोट्या जलबिंदूमुळे पसरत आहे तर लोकांना अशा ठिकाणी जाण्यापासून थांबवले पाहिजे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर सुरूवातीपासून या गोष्टींकडे लक्ष देऊन संशोधन केले असते, तर कदाचित आतापर्यंत लस बनवण्यासाठी पुढे जाता आले असते.

हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टीट्यूटचे संचालक डॉ. आशीष झा यांनी म्हटले की, आम्ही डब्ल्यूएचओवर विश्वास ठेवतो आणि आशा करतो की, ते सर्व देशांशी चांगला संपर्क ठेवून याबाबत डेटा उपलब्ध करतील, ज्यातून संशोधन पुढे जाईल. डब्ल्यूएचओचे टेक्नीकल हेड डॉ. मारिया वान के र्खोव यांनी म्हटले की, हे अजूनही दुर्मिळ दिसते की, एखाद्या दुसर्‍याच्या संपर्कात आल्याने व्हायरस दुसर्‍या व्यक्तीमध्ये सुद्धा जाऊ शकतो.