Coronavirus Update : ‘या’ स्मार्ट रिंगने मिळू शकतात कोरोनाच्या संसर्गाचे संकेत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरस (कोविड-19) चा सामाना करण्यासाठी एका स्मार्ट रिंगबाबत अभ्यास करण्यात आला आहे. याबाबत दावा करण्यात आला आहे की, बोटात घालता येणार्‍या या डिव्हाइसच्या मदतीने कोरोना संसर्गाचा खुपच प्रारंभिक आवस्थेत संकेत मिळू शकतो. ही स्मार्ट रिंग म्हणजे आंगठी सतत शरीराच्या तापमानाचा डाटा तयार करते. यामुळे त्या आवस्थेतच या घातक व्हायरसची माहिती मिळू शकते, जेव्हा कुणात कोरोना संसर्गाचा संशयसुद्धा नसतो.

सायंटिफिक रिपोर्ट्स पत्रिकेत सोमवारी प्रकाशित या अभ्यासानुसार, थर्मामीटरच्या तुलनेत हा डिव्हाइस आजारासाठी चांगला संकेत दर्शक आहे. यातून प्रारंभीच आयसोलेशन आणि चाचणीचा मार्ग सोपा होऊ शकतो. या पद्धतीने कोरोना कोरानासारखा आजार रोखण्यास मदत मिळू शकते. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष त्या 50 लोकांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारावर काढला आहे, ज्यांना अगोदर कोरोनाचा संसर्ग झाला होता.

त्यांनी स्माट रिंगकडून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण केले आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांमध्ये उच्च तापमान डिव्हाइसने अचूक ओळखले. त्यांनी सांगितले की, या पद्धतीने 50 पैकी 38 सहभागींमध्ये त्यावेळी ताप दिसून आला होता, जेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. शास्त्रज्ञांनी म्हटले की, शरीरात किंचित सुद्धा लक्षणे आढल्यास ही स्मार्ट आंगठी आजार ओळखते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या संशोधक एश्ले मेसन यांनी म्हटले की, शरीराच्या तापमानांवर अनेक घटकांचा परिणाम होतो. शरीराच्या तापमानावर सतत्याने लक्ष ठेवणे ताप ओळखण्याची चांगली पद्धत ठरू शकते.