SpaceX नं रचला इतिहास, 2 अंतराळ प्रवाशांना घेऊन सुरक्षित कक्षेत पोहचले रॉकेट

0
22
america spacex rocket

केप कन्वेरल : एलन मस्कची कंपनी स्पेस एक्सचे रॉकेट शनिवारी दोन अमेरिकन अंतराळ प्रवाशांना घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी रवाना झाले. एपी वृत्तसंस्थेनुसार, काऊंटडाउन संपताच नासाचे रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले नावाचे दोन अंतराळ प्रवाशांसोबत ड्रॅगन कॅप्सूल घेऊन खासगी कंपनी स्पेस एक्सचे रॉकेट फॉल्कन-9 स्थानिक वेळेनुसार, दुपारी 3.22 वाजता आपल्या प्रवासाला रवाना झाले.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, प्रक्षेपित केलेल्या रॉकेटने काही मिनिटातच अंतराळ प्रवाशांना सुरक्षित कक्षेत पोहचवले. यादरम्यान स्पेस एजन्सी नासा ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवून होती. उड्डाणाच्या काही सेकंद आधी डगलस हर्ले यांनी म्हटले, चला हा दिवा लावूयात… हेच वाक्य एलन शेपर्डने 1961 मध्ये प्रथम मानवी स्पेस मिशन दरम्यान म्हटले होते.

स्टेशनवर पोहचण्यासाठी लागतील 19 तास

अमेरिका प्रथमच एखाद्या खासगी कंपनीच्या रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलमध्ये अंतराळ प्रवाशांसोबत उड्डाण घेत आहे. या प्रक्षेपणासोबतच अमेरिकेत कमर्शियल स्पेस ट्रॅव्हलच्या एका नव्या युगाला सुरूवात होणार आहे. अमेरिकेच्या अगोदर रशिया आणि चीनने सुद्धा असे केले आहे. अंतराळात जाताना अंतराळ प्रवाशांना तेथील हवेच्या वेग नियंत्रण कक्षात राहावे लागेल. अंतराळ प्रवाशांचे पोहचण्याचे ठिकाण म्हणजेच अंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन 19 तासाच्या अंतरावर आहे.