Lockdown : 48 दिवस, 5 देशांच्या सीमा आणि एका विद्यार्थ्याचा सायकलवरून 2000 किलोमीटरचा प्रवास, तेव्हा मिळाले आई-वडीलांचे प्रेम

लंडन : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान अनेक अजब गोष्टी दिसून येत आहेत. ज्या गोष्टींबाबत कुणी विचारही करू शकत नव्हते, त्या गोष्टी घडून गेल्या आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान सार्वजनिक परिवहनची साधनेसुद्धा बंद होती. राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय उड्डाणेसुद्धा रद्द केली गेली. या कारणामुळे लोक पायी आपल्या घराकडे निघाले होते, जे पायी गेले नाहीत त्यांनी दुसरा आधार घेतला.

दोन हजार किलोमीटरचा दिर्घप्रवास
काही लोकांनी तर आपल्याच साधनांनी इतके अंतर पार केले की सर्वांनाच त्याचे आश्चर्य वाटले. असाच एक प्रकार लंडनच्या स्कॉटलँडमध्ये समोर आला आहे. स्कॉटलँडमध्ये राहाणार्‍या एका विद्यार्थ्याला घरी असणार्‍या आपल्या आई-वडीलांची इतकी आठवण आली की त्याने सायकलवरून 2000 किलोमीटरचा प्रवास करत 48 दिवस सायलक चालवली आणि आपल्या आई-वडीलांपर्यंत पोहचला. आपल्या मुलाला समोर पाहून आई-वडीलांच्या डोळ्यात आश्रू आले. या विद्यार्थ्याचे नाव क्लेन पापादिमित्रीऊ आहे. तो स्कॉटलँडच्या एबरडीनमध्ये एक यूनानी विद्यार्थी आहे.

20 वर्षांच्या पापादिमित्रीऊ, एबरडीन विद्यापीठात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगचा अभ्यास करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप पसरल्याने सर्वत्र शाळा कॉलेज आणि शिक्षण बंद आहे. शिक्षण बंद झाल्यानंतर त्याच्याकडे खुपच वेळ होता, याचा योग्य उपयोग करण्यासाठी त्याने एक योजना तयार केली. त्याने प्लॅन केला की, आता सायकलने कोरोनाग्रस्त युरोपच्या बाहेर जायचे.

सामान जमवण्यास केली सुरूवात
यानंतर पापादिमित्रीऊने आपली तयारी सुरू केली. त्याने सामान जमा करण्यास सुरूवात केली. यामध्ये फोन, पॉवर बँक, काही उपकरणे, कपडे, एक रेनकोट, एक विंडब्रेकर, एक तंबू, स्लिपिंग बॅग, चार दिवसांसाठी जेवण आणि पाणी ठेवले. याशिवाय एक पुस्तक सुद्धा त्याने आपल्यासोबत ठेवले, ते पुस्तक त्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचे होते.

पहिल्या दिवशी जेव्हा तो सायकलने आपल्या घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा काही किलोमीटर पोहचल्यानंतरच त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला. पापादिमित्रीऊने सांगितले की, त्याच्या आई-वडीलांना माहिती नव्हते की, तो कुठे आहे? यासाठी ते रडू लागले. त्यांना हे देखील माहित नव्हते की, घरातून बाहेर पडल्यावर तो आता रात्री कुठे थांबणार.

रात्री थांबण्यासाठी वाटू लागली भिती
रस्त्याने जात असताना त्याला एक पिझ्झा डिलिव्हरी करणारा मुलगा दिसला त्याने त्याला विचारले की रात्री कुठे थांबता येईल, तेव्हा त्या मुलाने सांगितले की, जवळच एक नर्सरी आहे तेथे थांबू शकतो. तिथे गेल्यानंतर पापादिमित्रीऊने पुन्हा आपल्यासाठी जेवण जमवले आणि आपल्या आई-वडीलांना फोन करून सांगितले की, तो कोणत्या ठिकाणी पोहचला आहे.

यानंतर तो आणखी पुढे निघाला, या दरम्यान 20 वर्षांच्या पापादिमित्रीऊ खुप काही शिकला. तो हे देखील शिकला की, अवघड परिस्थितीत स्वताला कसे सांभाळायचे. जेव्हा मनोबल कमी होते, तेव्हा समजते की जीवनात काही नाती किती महत्वाची असतात, असे तो म्हणाला.

अनेक अडचणींमध्ये गेला पहिला दिवस
पापादिमित्रीऊने सांगितले की, जेव्हा तो सायकलने आपल्या आई-वडिलांकडे जाण्यासाठी निघाला तेव्हा पहिला दिवस अनेक अडचणींचा होता. सर्वात जास्त समस्या बिघडलेले वातावरण आणि चढणीच्या रस्त्याची होती. त्याने एका दिवसात सुमारे 125 मैल अंतर पार केले. परंतु लवकर त्याचा जाणवले की, अशाप्रकारे तो लवकरच आपल्या घरी पोहचू शकतो. तत्पूर्वी त्याने एका दिवसात जवळपास 75 मैल अंतर कापले होते.

मित्राच्या घरी थांबला दोन दिवस
आपल्या प्रवासाच्या एक आठवड्यात तो उत्तर इंग्लंडचे एक शहर लीड्समध्ये एका मित्राच्या घरी पोहचला, तेथे तो दोन दिवस राहिला. त्याने स्कॉटलँड सोडल्यानंतर पहिली आंघोळ सुद्धा केली. यानंतर पापादिमित्रीऊच्या मनात आले की, तो जीवनात काय करत आहे. परंतु, त्याला त्याच्या आई-वडीलांकडे पोहचायचे होते. त्याचा पुढचा टप्पा ब्रिटनहून नेदरलँडपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याचा होता, हा प्रवास त्याने बोटीत सायकल ठेवून सीमा पार केली.

चार दिवसानंतर तो जर्मनीच्या एका शिबिरात पोहचला. येथे त्याच्या मित्राच्या मित्राने त्यास थांबण्याचा आग्रह केला. परंतु, कुणीही त्याला कोरोना व्हायरसमुळे आपल्या घरात जागा दिली नाही, अशावेळी त्याला रस्ता किंवा पार्कमध्ये तंबू लावून रात्र काढावी लागली. रस्त्यावर तंबू लावून थांबल्याने त्यालाही कोरोनाचा धोका होता, परंतु काळजी घेत त्याने तो धोका पार केला.

46 दिवसानंतर पोहचला ग्रीसमध्ये
पापादिमित्रीऊ अखेर 25 जूनला एबरडीन सोडल्याच्या 46 दिवसानंतर ग्रीसमध्ये पोहचला, येथे त्याचे आई-वडील त्याला पॅट्रासमध्ये भेटले, यानंतर त्याची कोरोना व्हायरस टेस्ट करण्यात आली, जी निगेटिव्ह होती. 27 जूनला तो अथेन्समधील आपल्या घरी पोहचला. तेव्हा त्याने म्हटले की, मला स्वत:लाच माहिती नव्हते की माझे मनोधैर्य किती उंच आहे. पण जर कुणी मला पुन्हा एवढेच अंतर सायलक चालवण्यास सांगितले तर माझ्यासाठी अवघड असेल.