अमेरिकेत भारताचा सन्मान वाढला ! भारतीय वंशाच्या वकिल सरिता कामोतिरेड्डी यांची जिल्हा न्यायाधीश पदावर नियुक्ती

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा एका भारतीय महिलेने भारताची मान उंच केली आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून भारतीय वंशाच्या सरकारी वकील सरिता कोमातिरेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी न्यूयॉर्कमध्ये एका फेडरल कोर्टात कोमातिरेड्डी यांचे जिल्हा न्यायाधीश म्हणून नाव घोषित केले. कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या दरम्यान अमेरिकेतून येणारी ही बातमी एकूण सगळ्यांनाच आनंद वाटेल यात शंकाच नाही.

या वर्षाच्या 12 फेब्रुवारीला अध्यक्ष ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्यासाठी युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करण्यासाठी कोमातिरेड्डी यांची नियुक्ती केली होती. व्हाईट हाऊसने सांगितले की, सोमवारी अध्यक्ष ट्रम्प यांनी कोमातिरेड्डी यांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया पुढे घेऊन, यूएस सिनेटला पाठविले. कोमातिरेड्डी या अमेरिकेच्या कोलंबिया लॉ स्कूलमध्ये कायद्याचे शिक्षण देतात.

यापूर्वी सरिता कोमातिरेड्डी त्याच जिल्ह्यातील माजी न्यायाधीश ब्रेट कवन्हो यांच्या नेतृत्वात काम करत होत्या. ते सध्या न्यूयॉर्कच्या पूर्व जिल्ह्यातील अमेरिकेच्या अटॉर्नीच्या कार्यालयात सामान्य गुन्ह्यांचे उपप्रमुख आहेत. कोमातिरेड्डी जून 2018 – जानेवारी 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि मनी लॉन्ड्रिंगचे उपप्रमुख होते. यासह, 2016-2019 मध्ये संगणक हॅकिंग आणि बौद्धिक संपत्तीचे समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी बीपी डीपवाटर होरिझन ऑयल स्पिल आणि ऑफशोर ड्रिलिंगसाठी वकील म्हणूनही काम केले.

अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाच्या महिलेची ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जात आहे. अमेरिकन राजकारणावर भारतीय वंशाचे लोक वर्चस्व गाजवितात. अशा परिस्थितीत राष्ट्रपती ट्रम्प यांनी हे पाऊल उचलून भारतीय वंशाच्या लोकांना भुरळ घालण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. अध्यक्षीय निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येत आहे, कोरोना साथीच्या काळात दोन्ही प्रमुख अमेरिकन पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे.