CM योगींच्या ‘मार्गा’वर ट्रम्प, अमेरिकेत दंगल करणार्‍यांचे फोटो ट्विट करून लोकांकडे मागितली त्यांची माहिती

वॉशिंग्टन : राजधानी दिल्ली आणि युपीमध्ये यावर्षी झालेली धार्मिक दंगल सर्वांनाच आठवत असेल. या दंगलीतील दंगलखोरांनी सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले, कोट्यवधीच्या संपत्तीला आग लावली होती.

योगींची कल्पना ट्रम्प यांनीही वापरली
दंगलखोरांच्या या उपद्रवावर सरकारने एक कल्पना अमलात आणली, परिसरातील सीसीटीव्ही दंगलीत सहभागी झालेल्या लोकांचे फोटो काढून त्याचे पोस्टर तयार करून ते शहरातील सर्व ठिकाणी लावले, सोबतच लोकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले. यातून काही लोकांची ओळख पटली. त्यावेळी योगी यांनी म्हटले होते की, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणार्‍यांना सोडणार नाही, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार.

फुटेज काढले, करत आहेत ट्विट
याच मार्गावर अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या आहेत. अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर तेथे ठिकठिकणी दंगल उसळली होती. फक्त भारतीतील दंगल आणि अमेरिकेतील दंगलीत फरक हा होता की, येथे एका कृष्णवर्णीयाच्या अन्यायकारक मृत्यूनंतर तेथे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांनी मिळून निदर्शने केली होती. यावेळी तेथे काही ठिकाणी तोडफोड आणि लूटमार झाली, करोडो रूपयांचे नुकसान झाले. आता ही दंगल शांत झाली आहे.

आता अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओतून काढलेले असंख्य लोकांचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहेत आणि लोकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मागील दोन दिवसांपासून ट्रम्प सतत असे फोटो ट्विट करत आहेत.

अमेरिकेच्या लेफायट्टे पार्कमध्ये झालेल्या दंगलीतील आरोपींचे फोटो अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या लोकांवर आरोप आहे की, त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अँड्रयू जॅक्सन यांचा पुतळा पाडला. राजधानी वॉशिंग्टनमध्ये स्थापन केलेली एक कॉन्फेडरेट जनरलचा पुतळा प्रतिमा आंदोलनकर्त्यांनी पाडला आणि त्याला आग लावली. ही घटना 19 जूनला झाली.

दोरखंडाने बांधून तोडले पुतळे
ग्रेनाईटपासून बनवलेला चबुतर्‍यावर स्थापन केलेला 11 फुटांचा अलबर्ट पाइक यांचा पुतळा साखळीने बांधून पाडण्यात आला आणि पुतळा पाडल्यानंतर निदर्शकांनी त्यांवर उड्या मारून निषेध केला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी तोडलेल्या पुतळ्याला लाकडांमध्ये ठेवून आग लावली. यादरम्यान निदर्शकांनी न्याय नाही, तर शांतता नाही आणि वंशवादी पोलीस नको, अशा घोषणा दिल्या. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्टसुद्धा करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये दिसत होते की पोलीस घटनास्थळी उपस्थित होते परंतु, निदर्शकांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला नाही.

पुतळे तोडून केला विरोध
निदर्शने करणार्‍यांनी अमेरिकेच्या सर्व शहरांमध्ये लावलेले पुतळे तोडून आपला विरोध दर्शवला. निदर्शकांनी एक-एक पुतळा शोधून ते तोडले. जे पुतळे तोडणे सोपे नव्हते ते रशीने बांधून खेचून पाडले आणि त्यांच्यावर रंग टाकला. आणि तेथे खुप काही लिहून ठेवले.

हटवावे लागले पुतळे
एक वेळ अशी आली, जेव्हा स्थानिक प्रशासनाला त्यांच्या येथे उभारण्यात आलेले पुतळे हटवावे लागले. प्रशासनाने पोलिसांच्या उपस्थितीत असे डझनभर पुतळे सुरक्षित ठिकाणी हलवले. अमेरिकेत अनेक ठिकाणी विशेष लोकांचे पुतळे लावण्यात आले आहेत, हे पुतळे त्या इतिहासकारांचे आहेत, ज्यांचे अमेरिकेत काहीना काही योगदान आहे.

निदर्शने करणार्‍या कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय लोकांना जेव्हा काही मिळाले नाही तेव्हा त्यांनी आपला राग या पुतळ्यांवर काढला, काही ठिकाणी पुतळ्यांच शीर तोडले, काही ठिकाणी दोरखंड बांधून ते पाडले तर काही ठिकाणी पुतळा पाडल्यावर त्यावर जोडे मारले.