बायडन प्रशासनात वाढतोय भारतीय वंशाच्या नागरिकांचा दबदबा, तिघांना बहाल केली ‘ही’ पदे

ह्यूस्टन : वृत्तसंस्था – बलाढ्य अमेरिका देशाच्या नव्या बायडन सरकारमध्ये आता तीन भारतीय वंशाच्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या प्रशासनाने या भारतीय वंशाच्या नागरिकांची तीन महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली आहे. बायडन प्रशासनाने सोनाली निझावन यांना समुदाय स्तरीय सरकारी संस्था अमेरिकोर्प्सच्या संचालकपदी नियुक्त केले आहे. या संघटनेत प्रेस्टन कुलकर्णी यांना परराष्ट्र व्यवहार प्रमुख केले गेले आहे. ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोच्या प्रमुख पदासाठी रोहित चोप्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमेरिकेने असे म्हंटलं आहे की, कुलकर्णी आणि निझवान हे बायडन प्रशासनाला त्यांच्या कामात पूर्णत: सहकार्य करतील. कोरोना साथीचा आजार, आर्थिक स्थिती, वांशिक समानता आणि हवामान बदल यासारख्या विषयांवर ते आपली सेवा बजावतील. प्रेस्टन कुलकर्णी हे सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहेत. आणि त्यांनी दोनदा सांसद निवडणूक लढविली आहे. त्यांच्याकडे सामाजिक जीवनाचा दीर्घ अनुभव आहे आणि त्याने 14 वर्षे परदेशी सेवेत आहेत.

सोनाली निझावन यांना देखील समुदाय पातळीवर काम करण्याचा अनुभव आहे. कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी स्टॉक्टन सर्व्हिस कॉर्प्समध्ये सहा वर्षे काम केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उत्कृष्ट सेवा दिल्या आहेत. रोहित चोप्रा यांना बायडन प्रशासनाने ग्राहक आर्थिक संरक्षण ब्युरोचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. या पदाची नेमणूक सिनेटच्या मंजुरीनंतर होईल. चोप्रा यांची मुदत पाच वर्षे असणार आहे. चोप्रा यांनी अमेरिकेच्या शिक्षण विभागात विशेष सल्लागार म्हणून काम केले आहे.

आणखी चार भारतीयांची नेमणूक
अलीकडेच, बायडन प्रशासनाने चार भारतीय-अमेरिकन लोकांना त्यांच्या सरकारच्या जबाबदार पदावर नियुक्त केले आहे. तारक शाह यांची ऊर्जा विभागातील चीफ ऑफ स्टाफ म्हणून नेमणूक केली आहे. या पदावर प्रथम भारतीयांची नेमणूक करण्यात आली आहे. तान्या दास यांना विज्ञान कार्यालयात चीफ ऑफ स्टाफ बनविण्यात आले आहे. नारायण सुब्रह्मण्यम यांना कायदेशीर समितीच्या कार्यालयात कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.