US च्या न्यायाधीशांनी विकिलीक्सला गोपनीय कागदपत्रे लीक करणाऱ्या माजी लष्करी विश्लेषकांच्या सुटकेचे दिले आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी विकिलीक्स प्रकरणाशी संबंधित माजी सैन्य विश्लेषक चेल्सी मॅनिंगची त्वरित सुटका करण्याचे आदेश दिले. अमेरिकन सैन्यात असताना लिंग परिवर्तन ऑपरेशनच्या माध्यमातून पुरुषातून महिला बनलेल्या मॅनिंगने २०१० मध्ये लाखो गोपनीय लष्करी व राजकीय कागदपत्रे विकिलीक्सला लीक केली होती. त्यात इराक आणि अफगाणिस्तान युद्धाशी संबंधित गोपनीय कागदपत्रेही होती. मॅनिंगने ही कागदपत्रे २००९ मध्ये इराक मध्ये एका अमेरिकी युनिटच्या विरुद्ध इराकमधील अमेरिकन युनिटमध्ये गुप्त विश्लेषक म्हणून काम करत असताना मिळविली होती.

अमेरिकन माध्यमांनुसार, न्यायाधीश एंटोनी जे ट्रेंगा यांनी गुरुवारी आपल्या निकालामध्ये म्हटले की, “ग्रँड ज्युरीसमोर हजर होण्याची गरज नसल्यामुळे मॅनिंगला कोठडीत ठेवण्याचा कोणताही हेतू नाही.” न्यायाधीशांनी मात्र मॅनिंगवर लादलेले दोन लाख ५६ हजार डॉलर (सुमारे एक कोटी ९०लाख रुपये) दंड कायम ठेवला. ३२ वर्षीय मॅनिंगने विकीलीक्सचे संस्थापक जूलियन अंसाजे यांच्याविरूद्ध साक्ष देण्यास नकार दिला. यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात त्याला ताब्यात घेण्यात आले होते. मॅनिंगने बुधवारी व्हर्जिनिया अटक केंद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

३५ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली
मॅनिंगला पहिल्यांदा २०१५ मध्ये अटक केली गेली होती. त्यावेळी हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल तिला ३५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु अध्यक्षांकडून माफी मिळाल्यानंतर मॅनिंगला २०१७ मध्ये सोडण्यात आले. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात शिक्षा माफ केली.