अमेरिका : हिंसक निषेधादरम्यान वॉशिंग्टनसह 40 शहरांमध्ये ‘कर्फ्यू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोलिस कोठडीत अमेरिकेतील एक काळी व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूविरोधात झालेल्या हिंसक निषेधांच्या पार्श्वभूमीवर रविवारी अमेरिकेच्या 40 शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला. वृत्तसंस्था एएनआयच्या मते, नॅशनल गार्डचे 5,000 सदस्य सक्रिय झाले आहेत आणि गरज पडल्यास आणखी 2000 तैनात केले जाऊ शकतात. बर्‍याच ठिकाणी `प्रदर्शने हिंसक झाली आहेत. व्हाईट हाऊसच्या बाहेरचा निषेधही हिंसक झाला आणि त्यानंतर पोलिसांना अश्रुधारेच्या गोळ्या झाडाव्या लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत न्यूयॉर्क ते टुल्सा आणि लॉस एंजेलिसपर्यंत प्रदर्शने होत आहेत. जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूप्रकरणी व्हाईट हाऊसबाहेर निदर्शक आणि पोलिस यांच्यात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

200 वर्ष जुन्या चर्चला आग, तर ह्यूस्टन शहरात 100 हून अधिक लोकांना अटक
वॉशिंग्टनमधील 200 वर्ष जुन्या सेंट जॉन एपिस्कोपल चर्चच्या तळघरात आग लागली आहे. जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यू प्रकरणी निदर्शनांनी वॉशिंग्टन आणि इतर अमेरिकन शहरांमध्ये हिंसक रूप धारण केले आहे आणि या काळात बर्‍याच ठिकाणी आग लावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे पोलिस कोठडीत काळी व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या दुसर्‍या दिवशी झालेल्या निषेधाच्या वेळी ह्यूस्टन शहरात 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. माहितीनुसार ह्यूस्टन पोलिसांनी रविवारी सकाळी ट्वीट केले की, विविध गुन्ह्यांमध्ये 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

बिडेनने निषेधाच्या ठिकाणांचा केला दौरा
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ट्विटरवर देशभरातील निदर्शकांविरोधात ‘कायदा व सुव्यवस्था’ आणि पोलिसांकडून कडक कारवाईचा संदेश देताना दिसून आले, तर जो बिडेन यांनी शांतपणे आप ले घराच्या विल्मिंगटन, डेलावेयरच्या परिसरातील निदर्शने केलेल्या ठिकाणांचा दौरा केला आणि काही निदर्शकांशी संवाद सांधला. ते अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत.

ट्रम्प यांना भूमिगत बंकरमध्ये हलविण्यात आले
वॉशिंग्टनमध्ये शुक्रवारी रात्री व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शक जमल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसच्या भूमिगत बंकरमध्ये नेण्यात आले. एएनआयने या संदर्भात माहिती दिली. ट्रम्प वरती येण्यापूर्वी एक तासापेक्षा कमी वेळ तेथे होते. शुक्रवारी शेकडो लोक व्हाईट हाऊसकडे वळाले. सिक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलिस अधिका-यांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले.

काय आहे प्रकरण
माहितीनुसार, जॉर्ज फ्लॉयड नावाच्या एका काळ्या अमेरिकन व्यक्तीच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूसंदर्भात ही निदर्शने होत आहेत. एका व्हिडिओमध्ये गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉइडच्या मानेवर गुढगा ठेवला होता. व्हिडिओमध्ये दिसते आहे की, पोलिस अधिकारी फ्लॉयडची मान त्याच्या गुडघ्याने सुमारे आठ मिनिटे दाबून धरत आहे. यावेळी, तो काळा यक्ती श्वासोच्छ्वास थांबल्याचे सांगताना दिसत आहे. याबद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like