Chinese Apps Ban in India : अमेरिकन सरकारला प्रमुख खासदारांनी केली भारतासारखे पाऊल उचलण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने टिकटॉकसह ५९ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याला अमेरिकेत खूप पाठिंबा मिळत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानल्या जाणार्‍या टिकटॉक अ‍ॅपवर काही प्रमुख खासदारांनी अमेरिकन सरकारकडे भारतासारखे पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाची, अखंडतेची आणि सुरक्षेचे पूर्वग्रह असल्याचे सांगत भारताने सोमवारी टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसह ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली. विशेष म्हणजे लडाखमध्ये लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने ५९ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

एका ट्वीटमध्ये शक्तिशाली रिपब्लिकन सिनेटर जॉन कॉर्नन यांनी एका वृत्ताला टॅग करत म्हटले, ‘प्राणघातक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक आणि डझनभर अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.’ रिपब्लिकनचे खासदार रिक क्रॉफर्ड यांनी ट्विट केले की, टिकटॉक जायला हवे आणि ते आधी जायला पाहिजे होते. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ’ब्रायन यांनी आरोप केला होता की, चीनी सरकार टिकटॉकचा उपयोग स्वत:च्या उद्देशाने करत आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, सांघिक सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाइल फोनवर टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसमध्ये किमान दोन बिले प्रलंबित आहेत. अमेरिकेत अशा भावनेला भारताच्या निर्णयानंतर अधिक वेग येऊ शकतो. ट्रेड अँड मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीचे अमेरिकन राष्ट्रपतींचे सहाय्यक पीटर नर्व्हारो यांनी ट्वीट केले की, ‘हे तेच चिनी टिकटॉक आहे का, जे तुळसा रॅलीत लोकांच्या कमी उपस्थितीसाठी वापरले गेले होते?’ त्यांनी चीनच्या सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल एका वृत्ताला टॅग केले. एका वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेलाही असेच करण्याचे आवाहन केले. लेखक गॉर्डन चांग म्हणाले की, भारताने ५९ चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे, ज्यात टिकटॉक देखील आहे. अमेरिका असे का करू शकत नाही?