‘हा’ मासा जमिनीवर 4 दिवस जिवंत राहू शकतो, अमेरिकेला हवाय त्याचा ‘खात्मा’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये या महिन्यात एक आगळा वेगळा मासा आढळून आला आहे. हा मासा तब्बल चार दिवस पाण्याविना राहून जमिनीवर जिवंत राहू शकते. तसेच जमिनीवर ये जा देखील करू शकतो. जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेसच्या वाइल्‍डलाइफ रिसोर्सेस डिवीजन नुसार ग्विनेट काउंटी पॉन्‍ड या भागातून माश्याला पकडण्यात आले आहे. मात्र जॉर्जिया प्रातांच्या अधिकाऱ्यांना हा मासा घातक असल्याचे वाटत आहे.

जल जीवनाला धोका
अमेरिकेने दिलेल्या एका सर्वेनुसार सापा सारखे तोंड असलेला हा मासा ज्या जलस्रोतात राहतो त्या ठिकाणचे राहणीमान नष्ट करतो. या माश्याच्या राहणीमानाचा पाण्यात राहणाऱ्या अन्य जीवांवर देखील परिणाम होतो. जर या माशांची संख्या वाढली तर बाकी जल जीवांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो कारण हा मासा आपल्या सोबत राहणाऱ्या इतर माश्यांचे खात असतो. एका रिपोर्टनुसार जमिनीवर राहताना या माश्याकडून उंदरांना भक्ष बनवल्याचेही समोर आले आहे.

अधिकाऱ्यांनी लोकांना या माशाला मारण्याचा संदेश दिला
या माशाकडून बाकी जीवांना धोका असल्यामुळे वन अधिकारी या माशाला पाळण्यास तयार नाहीत. त्याचप्रमाणे शहराच्या अन्य कोणत्या भागात या माशाचा वावर आहे का हे देखील तपासले जात आहे. अधिकाऱ्यांनी लोकांना हे देखील सांगितले आहे की तुम्ही या माशाला कसे ओळखायचे आणि कसे मारायचे हे देखील शिकून घ्या.

पाणी नसतानाही हा मासा राहू शकतो जिवंत
हा मासा तीन फुटांपेक्षा मोठा आणि आठ किलोपेक्षा अधिक वजनाचा असू शकतो. याच्या शरीरात खास लॅडर नामक एक भाग आहे. ज्यामुळे हा मासा सहज श्वास घेऊ शकतो यामुळेच हा मासा पाण्यातून निघून जमिनीवर जाऊ शकतो. चार दिवसांपर्यंत हा मासा पाण्याशिवाय राहू शकतो. 2002 पर्यंत हा मासा खाण्यासाठी सुद्धा वापरला जात होता. मात्र त्याच वर्षी अमेरिकेने याला धोकादायक वन्यजीव म्हणून घोषित केले.

Visit : Policenama.com