‘कोरोना’ला गंभीर होण्यापासून रोखतं व्हिटॅमिन-D, मृत्यूचा धोकाही होतो कमी, जाणून घ्या Vitamin-D मिळवण्याचे स्त्रोत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना संसर्ग गंभीर होण्यापासून रोखण्यामध्ये व्हिटॅमिन डीची असणारी भूमिका उघडकीस आली आहे. अभ्यासामध्ये असे आढळले आहे की व्हिटॅमिन डीचे प्रमाण योग्य पातळीत असेल तर रुग्णाला कोरोनामुळे होणारा धोका कमी होतो. या महिन्याच्या सुरूवातीस झालेल्या आणखी एका अभ्यासात असे आढळले आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो.

व्हिटॅमिन डी एक हार्मोन आहे जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आपली त्वचा आल्यानंतर निर्माण होते. हे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फेटचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते, जे हाडे, दात आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पीएलओएस वन या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन डीची पातळी कमी असलेल्या रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रूग्णांच्या मृत्यूची आणि वाढत्या धोक्यात लक्षणीय घट झाली.

हा निष्कर्ष 235 रूग्णांवर केलेल्या अभ्यासावर आधारित आहे. या कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण मोजले गेले. व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी असलेल्या पीडितांमध्ये गंभीर संक्रमण आढळले. अशा पीडितांना बेशुद्ध पडणे आणि त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास सहन करावा लागला. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-सी आणि डी अधिक प्रमाणात असले पाहिजे.

“हा अभ्यास शरीरात व्हिटॅमिन डीच्या पर्याप्त उपस्थितीमुळे धोका कमी होऊ शकतो याचा थेट पुरावा दर्शवतो,” असे अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक मायकेल एफ. होलिक यांनी सांगितले. व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश आहे. यासाठी सूर्यप्रकाशाची नियमित सवय लावायला हवी. याशिवाय अंड्यातील पिवळ बलक, टूना, सोया दूध आणि टूना फिशचे सेवन करूनही व्हिटॅमिन-डी मिळू शकते.